ह्या देशात डेल्टा व्हेरिएंटचे संक्रमण वाढले ! एका प्रांतात लॉकडाऊन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- चीनच्या अनेक भाागांत काेराेनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे संक्रमण वाढले आहे. त्यामुळे चीनने एका काउंटीत लॉकडाऊन लावले आहे.

चीनच्या वायव्येकडील इनर मंगोलियातील एजिन काउंटीतील लोकांना सोमवारपासून घरातच थांबण्यास सांगण्यात आले . एजिन कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. येथे मागील आठवड्यात १५० हून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत.

लोकांना कोविड निर्बंधांचे सक्तीने पालन करण्यास सांगण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

चीनच्या आरोग्य संस्थेने इशारा दिला की, एका आठवड्यातच कोरोना संक्रमण ११ राज्यांत पसरले आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे.

या इशाऱ्यानंतर एजिनमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. चीनमध्ये सोमवारी ३८ कोरोना रुग्ण आढळले आहेत. यातील निम्मे इनर मंगोलियातील आहेत.

राजधानी बीजिंगमध्ये सुमारे डझनभर रुग्ण आढळले. त्यामुळे ज्या ठिकाणी कोरोना संक्रमण आहे तेथील नागरिकांना बीजिंगमध्ये येण्यास निर्बंध असून येणाऱ्या व्यक्तीकडून ४८ तासांपूर्वीचा निगेटिव्ह अहवालही मागवला जात आहे.

गांसू प्रांतात कोरोनाचे नवे रुग्ण आढळल्यानंतर सोमवारी येथील सर्वच पर्यटनस्थळे बंद करण्यात आली. गांसू प्रांत बौद्ध धर्माशी संबंधित चित्रांची लेणी आणि इतर धार्मिक स्थळांसाठी ओळखला जातो.

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ३५ नवे रुग्ण आढळले आहेत. यातील चार गांसूतील आहेत. जास्त रुग्णसंख्या प्रवासी समूहांत आढळून आल्याने पर्यटनाशी संबंधित रेल्वेवर बंदी घालण्यात आली.