Diwali 2022 : यावेळी का खास असणार दिवाळी ? जाणून घ्या एका क्लिकवर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Diwali 2022 : आपल्यापैकी अनेकजण दिवाळीची (Diwali) आतुरतेने वाट पाहत असतील. हा सण (Festival)  मोठ्या उत्साहात साजरी करतात.

दिवाळीच्या दिवशी (Deepavali 2022) घर त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी दारापुढे आकर्षक रांगोळी काढतात. तेलाच्या दिव्यांनी (2022 diwali) परिसर सजविण्यात येतो.

दिवाळी 2022 तारीख

दिवाळी हा सण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला साजरा केला जातो. या वेळी अमावस्या तिथी 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर दोन दिवसांची (Diwali 2022 date) आहे. 25 तारखेला अमावस्या तिथी प्रदोष कालाच्या आधी म्हणजेच संध्याकाळच्या आधी संपत आहे,

तर 24 ऑक्टोबरला प्रदोष काळातील अमावस्या तिथी असेल, त्यामुळे देशभरात दिवाळी 24 ऑक्टोबरलाच साजरी केली जाईल. यावेळची खास गोष्ट म्हणजे छोटी दिवाळी म्हणजेच नरक चतुर्दशीही याच दिवशी साजरी केली जाणार आहे.

दिवाळीचा खास प्रसंग

रविवारी त्रयोदशी तिथी संध्याकाळी 6:4 मिनिटांपर्यंत (Diwali in 2022) असेल, त्यानंतर चतुर्दशी तिथी सुरू होईल, चतुर्दशी तिथी 24 तारखेपर्यंत राहील आणि चतुर्दशी तिथी संध्याकाळी 5:28 वाजता संपेल आणि अमावस्या तिथी सुरू होईल आणि दिवाळीचा मुहूर्त (Diwali on 2022) सुरू होईल. केले जाईल. अमावस्या तिथी संध्याकाळी 4:19 पर्यंत राहील.

दिवाळी का साजरी केली जाते?

दिवाळीचा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्रीराम रावणाचा वध करून 14 वर्षांचा वनवास पूर्ण करून अयोध्येला परतले. या दरम्यान प्रभू रामाच्या आगमनाच्या आनंदात लोकांनी घरोघरी दिवे लावले होते, तेव्हापासून हा दिवस साजरा केला जाऊ लागला.

दिवाळीला लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त

लक्ष्मीपूजनाचा (Lakshmi Pujan 2022) शुभ मुहूर्त 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.53  ते 8.16 पर्यंत आहे.

बलप्रतिपदा/दिपावली पाडवा

कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा म्हणुन साजरा करतात.त्याचबरोबर हा दिवस दिवाळी पाडवा म्हणूनही ओळखला जातो, लोक दिवाळीतील पाडव्याला नववर्षाची सुरुवात मानतात. या दिवशी प्रत्येक घरी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी आपल्या पतीचे औक्षण करतात. त्याचबरोबर नवविवाहित दांपत्य आपली पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करत असतात.

बलिप्रतिप्रदेची पूजा

बलिप्रतिपदेच्या पूजेला या दिवशी विशेष महत्त्व आहे. बलिप्रतिपदेतला बळिराजा हा शेतकरी राजा होता. त्याला तीन पावले जमिन दान स्वरूपात मागून विष्णूच्या वामन अवताराने मारले.

हा राजा जनतेची काळजी घेत होता त्याचे राज्य अजूनही यावे यासाठी ग्रामीण भागातील अजूनही स्त्रिया भावाला ओवाळताना “इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो” म्हणतात.

दिवाळी शॉपिंग

दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न असेल तर घरात वर्षभर सुख-समृद्धी, सुख-शांती नांदते, अशीही एक धारणा आहे. अनेकजण या दिवशी खरेदी करतात.