file photo

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर महापालिकेमार्फत स्मार्ट एलईडी प्रकल्पासाठी प्रशासकीय स्तरावर कार्यवाही सुरू असताना विघ्नसंतोषींकडून या प्रकल्पाला खोडा घालण्याची शक्यता आहे.

विकासकामांना खोडा घालणाऱ्या ब्लॅकमेलर नगरसेवकांना मनपाने थारा देऊ नये, अशी मागणी पहिलवान प्रतिष्ठानने आयुक्त शंकर गोरे यांना निवेदनाद्वारे केली आहे. प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाने आयुक्त गोरे यांना भेटून निवेदन दिले.

विघ्नसंतोषी लोकांकडून विकास कामाचा खोडा घालण्याची प्रथा आहे. शहराच्या विकासकामात जर कोणी आडकाठी घालत असेल तर या नगरसेवकांना व ब्लॅकमेलरला प्रतिष्ठान त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही,

असा इशारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ओंकार घोलप यांनी दिला आहे. कामांच्या प्रशासकीय फाईली हस्तकांमार्फत मनपा कार्यालयातून स्वतःच्या घरी नेल्या जातात.

त्या ठिकाणी ठेकेदाराला बोलावून आर्थिक मागणी करण्यात आल्याचा गाैप्यस्फोटही केला आहे. ब्लॅकमेलर नगरसेवकांना मनपाने थारा देऊ नये, असेही पत्रात म्हटले आहे.

यावेळी गणेश गोरे, सागर आहेर, कृष्णा भागानगरे, अक्षय बोरुडे, रोहित सोनेकर, ऋषिकेश कुसकर, आदित्य फाटक, ओंकार मुदगंटी, शिवम घोलप, शाहिद सय्यद, अजय तडका, सुशांत राठोड,

ओंकार बिडकर, शुभम कोमाकूल, ओम दोन्टा आदी मान्यवर उपस्थित होते. त्यावर आयुक्त गोरे यांनी दिवाळीपर्यंत एलईडी बहुतांश प्रकल्प मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.