मुसळधार पावसामुळे आता जिल्ह्यातील ‘हे’ धरण ओव्हरफ्लोच्या मार्गावर

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस होत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचा प्रवाह देखील वाढला आहे. यातच जिल्ह्यासाठी समाधानकारक माहिती समोर येत आहे.

नुकतेच नगर जिल्ह्याची जीवनदायनी भंडारदरा हे धरण भरले असून आता जिल्हयातील डिंभे धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी धरण पाणलोट क्षेत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला आहे.

त्यामुळे गेल्या आठ दिवसांत धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. डिंभे, पिंपळगाव जोगे धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे डिंभे धरण लवकरच ओव्हरफ्लो होईल, यामुळे संधान व्यक्त केले जाऊ लागले आहे.

डिंभे धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. माणिकडोह धरण मात्र ५२ टक्केच भरले आहे. डिंभे – माणिकडोह बोगदा झाला तर कुकडीतील तीन ते चार टीएमसी पाण्याची तूट भरून निघण्यास मदत होईल.

दरम्यान कुकडीत गेल्यावर्षी २१ हजार ५२५ एमसीएफटी (७३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा २० हजार ६२७ एमसीएफटी (७० टक्के) इतका साठा झाला आहे.

Ahmednagarlive24 Office