Mulank 6 Rashifal : ‘या’ तारखांना जन्मलेल्या लोकांसाठी नवीन वर्ष असणार खूप लकी, जाणून घ्या सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mulank 6 Rashifal : नवीन वर्ष सुरु व्हायला फक्त दिवस उरला आहे. अनेकांना या वर्षाची उत्सुकता लागली आहे. तर काहींना येणारे वर्ष आपल्यासाठी कितपत फायद्याचे असणार त्याची उत्सुकता लागली आहे.

जर तुम्हालाही अशीच उत्सुकता लागली असेल तर तुमच्यासाठी ही बातमी फायद्याची आहे. जर तुमचा मूलांक 6 असेल तर नवीन वर्ष खूप चांगले जाईल. तसेच व्यवसायात फायदा होईल.

व्यावसायिकांसाठी महत्त्वाचे

येणारा काळ करिअरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असणार आहे. नवीन वर्षाचे पहिले सहा महिने व्यावसायिकांसाठी खूप भाग्यवान ठरणार असून तुम्ही नवीन प्रोजेक्टही सुरू करू शकता. परंतु, जुलै महिन्यानंतर कोणत्याही प्रकारची सुरुवात करू नका. नोकरी शोधणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारवाढ मिळू शकतो. साहजिकच त्यांचे उत्पन्नही वाढेल.

नातेसंबंध आणि कौटुंबिक कुंडली

प्रेमप्रकरण असेल तर तुमच्यासाठी येणारा काळ कठीण जाऊ शकतो. लहान शंका-कुशंका यामुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु, विवाहित जोडप्यांसाठी येणारा काळ चांगला राहील. सोबतच कौटुंबिक जीवन चांगले आणि आनंदी होईल. अनेक काळापासून सुरू असलेले संपत्तीचे वादही हळूहळू सुटतील.

आरोग्य

आरोग्याच्या दृष्टीने नवीन वर्ष चांगले जाईल, परंतु जुलै, ऑगस्ट आणि नोव्हेंबर महिन्यात जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. हवामानामुळे होणारे आजार आणि संक्रमणाचा धोका कायम राहू शकतो.

उपाय

दर शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करून अविवाहित मुलींना भोजन द्या. तसेच दर शुक्रवारी श्रीसूक्ताचे वाचन करावे.