Fifa World Cup Finals Schedule: मेस्सी-रोनाल्डो कधी भिडणार ? जाणून घ्या फिफा विश्वचषक उपांत्यपूर्व फेरीचे संपूर्ण वेळापत्रक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fifa World Cup Finals Schedule:  कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा विश्वचषक 2022 आता शेवट होण्याच्या मार्गावर आहे.  या स्पर्धेमध्ये आता उपांत्यपूर्वफेरीचे सामने सुरु होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो या जगातील आठ बेस्ट संघ  उपांत्यपूर्व फेरीत एकमेकांशी भिडणार आहे.

या आठ संघामध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल आणि लिओनेल मेस्सीचा अर्जेंटिना संघ देखील आहे. यामुळे मेस्सी आणि रोनाल्डो यांच्यात सामना कधी होणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.तर आज जाणून घ्या उपांत्यपूर्व फेरीत मेस्सी आणि रोनाल्डोमध्ये समान होणार की नाही.

उपांत्यपूर्व फेरीत मेस्सी-रोनाल्डोची लढत होणार नाही

मेस्सीच्या अर्जेंटिना संघाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे. तर पोर्तुगीज संघाला मोरोक्कोचा सामना करावा लागणार आहे. उपांत्यपूर्व फेरीनंतर उपांत्य फेरीत मेस्सी आणि रोनाल्डोची स्पर्धा होणार नाही, हीही चाहत्यांच्या निराशेची बाब आहे.

याचे कारण म्हणजे अर्जेंटिनाने आपला सामना जिंकल्यास उपांत्य फेरीत त्याचा सामना नेमारच्या संघ ब्राझील किंवा क्रोएशियाशी होईल. दुसरीकडे, रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाने उपांत्यपूर्व फेरीतील सामना जिंकला तर उपांत्य फेरीत त्याचा सामना किलियन एमबाप्पेच्या फ्रान्स किंवा हॅरी केनच्या संघ इंग्लंडशी होईल. अशा परिस्थितीत उपांत्य फेरीत मेस्सी-रोनाल्डोची स्पर्धा दिसणे क्वचितच शक्य आहे. मात्र या दोघांनी आपापल्या सेमीफायनलमध्ये विजय मिळवला तर फायनलमध्ये त्यांच्यात नक्कीच टक्कर होऊ शकते. हा विजेतेपदाचा सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे.

मेस्सी-रोनाल्डोचा हा शेवटचा विश्वचषक असेल

लिओनेल मेस्सीने यावर्षी वयाची ३५ वर्षे ओलांडली आहेत. तर रोनाल्डो पुढच्या वर्षी 5 फेब्रुवारीला 38वर्षांचा होईल. अशा स्थितीत मेस्सी आणि रोनाल्डोचा हा शेवटचा विश्वचषक ठरणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीचे वेळापत्रक  (भारतीय वेळ)

9 डिसेंबर – ब्राझील विरुद्ध क्रोएशिया (रात्री 8.30)

9 डिसेंबर – अर्जेंटिना विरुद्ध नेदरलँड्स (दुपारी 12.30)

10 डिसेंबर – पोर्तुगाल विरुद्ध मोरोक्को (रात्री 8.30)

10 डिसेंबर – इंग्लंड विरुद्ध फ्रान्स (दुपारी 12.30)

फिफा विश्वचषक उपांत्य फेरीचे वेळापत्रक

13 डिसेंबर – ब्राझील/क्रोएशिया विरुद्ध अर्जेंटिना/नेदरलँड्स (12.30 PM)

14 डिसेंबर – पोर्तुगाल/मोरोक्को विरुद्ध इंग्लंड/फ्रान्स (12.30 PM)

तिसऱ्या स्थानासाठी लढा 17 डिसेंबर – उपांत्य फेरीतील दोन पराभूत संघामधील सामना (रात्री 8.30 वाजता)

विजेतेपदासाठी अंतिम सामना 18 डिसेंब  (रात्री 8.30 वाजता)

हे पण वाचा :-   Elon Musk News : Tesla साठी इलॉन मस्कने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; अनेक चर्चांना उधाण, वाचा सविस्तर