Fire Boltt : फायर-बोल्टने पुन्हा आणले स्वस्तात स्मार्टवॉच, मिळणार शानदार फीचर्स, पहा किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fire Boltt : जर तुम्ही फायर-बोल्टचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण या कंपनीने पुन्हा एकदा आपले नवीन स्मार्टवॉच आणले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खूप स्वस्तात तुम्ही हे स्मार्टवॉच सहज खरेदी करू शकता.

फायर-बोल्ट ही सर्वात लोकप्रिय स्मार्टवॉच कंपनी असून ती आपल्या शानदार फीचर्समुळं ग्राहकांना आकर्षित करत असतेच. तसेच इतर स्मार्टवॉच निर्मात्या कंपन्यांना कडवी टक्कर देत असते. कंपनीने आता आपले Fire-Boltt Collide हे स्मार्टवॉच आणले आहे. जाणून घेऊयात त्याची खासियत.

जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि तपशील

कंपनीच्या फायर-बोल्टच्या या नवीन स्मार्ट वॉचमध्ये तुम्हाला 360×360 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.32 इंच रेटिना लेव्हल डिस्प्ले मिळणार आहे. जो 500 nits पर्यंत पीक ब्राइटनेस लेव्हलसह येतो. या वॉचमध्ये, कंपनी 100 पेक्षा जास्त वॉच फेस ऑफर करत आहे, जे वापरकर्ते त्यांच्या शैली आणि मूडनुसार सेट करता येते. या वॉचमध्ये तुम्हाला ब्लूटूथ कॉलिंगची सुविधाही मिळणार आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ 5.2 दिले गेले आहे.

फिटनेस आणि आरोग्यासाठी यात 70स्पोर्ट्स मोड्स शिवाय, स्मार्ट वॉचमध्ये हृदय गती आणि SpO2 सह स्लीप आणि पीरियड सायकल मॉनिटर देण्यात आला आहे. तुम्हाला या घड्याळात एक रोटरी क्राउन बटण दिसून येईल जे 10.7mm च्या स्लीक बॉडीसह येत आहे.

या स्मार्ट वॉचची खासियत सांगायची झाली तर यात गेम खेळण्यासोबतच ग्राहकांना त्यामधून संगीत आणि कॅमेरा रिमोट कंट्रोल करता येते. हे स्मार्ट वॉच व्हॉईस असिस्टंट सपोर्टने सुसज्ज असून याच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास कंपनी यात 330mAh ची बॅटरी देत ​​आहे. बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केली तर ती बॅटरी 7 दिवस टिकते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.