अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- मुलीस फुस लावून पळवून नेणार्‍या आरोपीला अटक करण्यात पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाला यश आले आहे.

भाऊसाहेब ऊर्फ मनोज देवराम हंडाळ (रा. हंडाळवाडी ता. पाथर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पिडीत अल्पवयीन मुलीला देखील ताब्यात घेतले आहे.

तपासकामी त्यांना पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मनोज हंडाळ याने एप्रिल २०१७ मध्ये एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेले होते.

याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे असून. सदरचा गुन्हा तपासकामी एप्रिल २०१८ मध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाकडे वर्ग करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा पोलीस तपास करत असताना सदरची पिडीत मुलगी व मनोज हंडाळ नगरमार्गे पुणे येथे जात असल्याची माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारे सहायक निरीक्षक सतिष गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने पुणे बस स्थानक परिसरात सापळा लावला.

दरम्यान आरोपी हंडाळ या परिसरात येताच त्याच्यासह अल्पवयीन मुलीला बस स्थानकावर ताब्यात घेतले. पुढील तपास पाथर्डी पोलीस करीत आहेत.