जिल्हा परिषदेच्या ‘त्या’ कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्या! ‘या’ जिल्हा परिषद सदस्याची मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- सध्या करोनाची दुसरी लाट आल्याने अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढती आहे. त्यानंतर तिसऱ्या लाटेचाही इशारा आरोग्य तज्ञांनी दिला आहे.

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्वतोपरी प्रयत्न चालू असून, अधिकारी-कर्मचारी या कामात अहोरात्र व्यस्त आहेत. सध्या संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक गावात करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी सर्व्हेक्षण करण्यात येते.

हे जोखमीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे विमा संरक्षण देण्यात आलेले नाही. तरी यांना हे कवच द्यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी केली आहे.याबाबत त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

यात त्यांनी म्हटले आहे की,सर्व कर्मचारी तुटपुंज्या पगारावर कार्यरत आहेत. कमी पगार असूनही केवळ कुटुंब प्रमुख म्हणून कौटुंबिक जबाबदारी असल्याने हे सर्व कार्यरत आहेत. या सर्वांना आता  सर्व्हेक्षणाचे जोखमीचे काम देण्यात आले.

सर्व्हेक्षण करताना कोरोना लागण झाल्यास साध्या औषधोपचाराचीही परिस्थिती यांची नाही. त्यामुळे लाखो रुपयांचा उपचार खर्च हे कसे पेलतील? जिल्हा परिषदेच्या इतर अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची आणि त्यांचे कुटुंबाचीदेखील औषधोपचाराची जबाबदारी सरकार स्वीकारते.

किंबहूना त्यांना याबाबदचे पुर्ण संरक्षण सरकारकडून दिले जाते.भरपूर पगार असल्याने त्यांचा आणि कुटुंबाचा आरोग्य विमाही असतो. परंतु वरील १५६७५ कर्मचाऱ्यांना असा कोणताही आधार नाही. कमी पगारात चरितार्थच मुश्किल आहे तर करोना लागण झाल्यास ते खर्च कसा पेलणार? हा मोठा प्रश्न आहे.

त्यामुळे अशा सर्व कर्मचाऱ्यांना संबंधित ग्रामपंचायतकडून आरोग्य विम्याचे संरक्षण मिळाल्यास त्यांचेसाठी मोठा आधार निर्माण होईल. एक वर्षभराचा जरी ग्रामपंचायतने आरोग्य विमा संबंधितांचा उतरविला तरी फार खर्च येणार नाही.

म्हणून आपण जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतना या सर्व कर्मचाऱ्यांना विमासंरक्षण द्यावे. म्हणून आदेश काढण्याची गरज आहे.

आपल्या आदेशामुळे हे कर्मचारी आणि पर्यायाने त्यांचे कुटुंबियही संरक्षणात येतील. या जोखमीच्या कामात आरोग्य विमा काढून या सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा संरक्षण द्यावे.असे त्यांनी शेवटी नमूद केले आहे.