अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :-  गेल्यावर्षी सार्वकालिक उच्चांकाला गवसणी घालणाऱ्या सोन्याचा दरात सध्या घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या चार दिवसांत तिसऱ्यांदा सोन्याची किंमतीत घट नोंदवण्यात आली आहे.

मंगळवारी सकाळच्या सत्रात मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजवर (MCX) ऑक्टोबर वायद्याच्या सोन्याचा भाव 0.1 टक्क्यांनी म्हणजे साधारण 48 रुपयांनी घसरला.

तर डिसेंबर वायदाच्या चांदीचा दर 0.24 टक्के म्हणजे साधारण 149 रुपयांनी घसरला. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम दिली आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर हे विदाउट टॅक्स आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारात दरांमध्ये फरक आहे.

भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव

ग्रॅम   22 कॅरेट (भाव रुपयांत)

1ग्रॅम  4,614

8 ग्रॅम  36,912

10 ग्रॅम  46,140

100 ग्रॅम  4,61,400

भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव –

ग्रॅम  24 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम  5,034

8 ग्रॅम  40,272

10 ग्रॅम  50,340

100  ग्रॅम 5,03,400

प्रमुख शहरातील सोन्याचे भाव –

शहर  22 कॅरेट  24 कॅरेट

मुंबई  46,000  47,000

पुणे  45,220  48,410

नाशिक  45,220  48,410

अहमदनगर  4,5180  47,440