Post Office : कमाईची सुवर्णसंधी! ‘या’ योजना देत आहेत सर्वात जास्त परतावा, आत्ताच करा गुंतवणूक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office : अनेकजण चांगल्या भविष्यासाठी गुंतवणूक करत असतात. सध्या अशा अनेक योजना आहेत ज्यात तुम्ही गुंतवणूक करून चांगले पैसे मिळवू शकता. इतकेच नाही तर या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता तसेच तुम्हाला कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही.

तसेच जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर चांगल्या परताव्यांसोबत आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत करही वाचवू शकता. या सर्व योजना सरकारी योजना आहेत. या योजना कोणत्या आहेत? त्यात कशी गुंतवणूक करावी?पाहुयात त्यांची यादी सविस्तर..

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी

सरकारची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही दीर्घकालीन बचत योजना आहे जी कलम 80C अंतर्गत 7.1 टक्के चक्रवाढ व्याज आणि कर सूट देत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, एखाद्याला किमान 15 वर्षे गुंतवणूक करावी लागणार आहे तुम्ही वार्षिक 1.5 लाखांपर्यंत कर वाचवू शकतो.

सुकन्या समृद्धी योजना

तसेच, सुकन्या समृद्धी योजना ही विशेषत: 10 वर्षांखालील मुलींसाठी एक उत्तम योजना आहे. तुम्ही गुंतवलेले पैसे वयाच्या 18 व्या वर्षी काढता येतात आणि 21 वर्षांनंतर पूर्ण रक्कम मिळू शकता. या योजनेत 7.6 टक्के व्याजदर उपलब्ध आहे तसेच तुम्हाला 1.5 लाखांपर्यंत वार्षिक कर वाचवता येतो.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

ज्येष्ठ नागरिक बचत योजना वर्षाला एकूण 8 टक्के व्याजदर देते. यामुळे 1.5 लाखांपर्यंत कर सवलत मिळते. इतकेच नाही तर या योजनेतील गुंतवणुकीची मर्यादा नुकतीच 30 लाखांपर्यंत वाढवली आहे.

टाइम डिपॉझिट स्कीम

पोस्ट ऑफिसची दुसरी योजना टाइम डिपॉझिट स्कीम आहे. यात पाच वर्षांसाठी गुंतवणुकीचा पर्याय देते आणि या योजनेत1.5 लाखांपर्यंत कर सूट मिळते. 7 टक्के व्याजदरासह, ही योजना कर वाचवू पाहणाऱ्यांसाठी एक चांगला पर्याय असू आहे.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना

तसेच नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेची 1000 रुपयांपासून सुरू करता येते. या योजनेत 7 टक्के व्याजदर उपलब्ध असून कलम 80C अंतर्गत, या योजनेतून 1.5 लाखांपर्यंत कर वाचवता येतो.