Gold Price Update : सोने खरेदीची सुवर्णसंधी! पुन्हा घसरले दर, जाणून घ्या नवीनतम दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Update : सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. या काळात मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदीची खरेदी केली जाते. अशातच याच खरेदीदारांसाठी एक सुवर्णसंधी आह. कारण पुन्हा एकदा सोने आणि चांदी स्वस्त झाले आहे. जर तुम्ही आज खरेदी केली तर तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते.

आजपासून नवीन व्यावसायिक सप्ताहाला सुरुवात होत आहे. त्यामुळे आज सगळ्यांचे लक्ष सोने आणि चांदीच्या जाहीर होणाऱ्या नवीन किमतींकडे असणार आहे. आजही सोने आणि चांदीच्या किमती कमी होणार की वाढणार? जाणून घ्या.

सध्या सोने 58000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 66000 रुपये प्रति किलो या पातळीवर विकले जात आहे. मागच्या आठवडाभरात सोने आणि चांदीचे भाव तेजीत राहिले आहेत. मागील आठवड्यात सोन्याचा भाव 2552 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 4982 रुपये प्रति किलोने घसरला आहे.

नवीन दर आज होणार जाहीर

खरं तर, आजपासून नवीन व्यावसायिक सप्ताहाला सुरुवात होत आहे. आज नवीन व्यावसायिक आठवड्याचा पहिला दिवस असून मागील व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला, सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत कमालीची वाढ झाली होती. त्यामुळे आज नव्या व्यावसायिक आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीची वाटचाल कशी होते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

पहा मागच्या आठवड्याचे दर

मागच्या आठवड्यात म्हणजे शुक्रवारी सोने प्रति 10 ग्रॅम 121 रुपयांनी स्वस्त होऊन 58220 रुपये प्रति किलोवर बंद झाले होते. तर गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 439 रुपयांनी महाग होऊन 58341 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला.

तसेच शुक्रवारी सोन्यासोबतच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. शुक्रवारी चांदीचे दर 538 रुपयांनी घसरून 66773 रुपये प्रति किलोवर बंद झाले आहेत. तर गुरुवारी चांदी 450 रुपयांच्या उसळीसह 67311 रुपये प्रति किलोवर बंद झाली आहे.

जाणून घ्या नवीनतम 14 ते 24 कॅरेट सोन्याच्या किमती

या घसरणीनंतर 24 कॅरेट सोने 121 रुपयांनी स्वस्त होऊन 58220 रुपयांवर, 23 कॅरेट सोने 120 रुपयांनी स्वस्त होऊन 57987 रुपयांवर, 22 कॅरेट सोने 111 रुपयांनी स्वस्त होऊन 53329 रुपयांवर, 18 कॅरेट सोने 100 रुपयांनी स्वस्त होऊन 43665 आणि 14 कॅरेट सोने स्वस्त होऊन 72 रुपयांनी स्वस्त झाल्याने 34058 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार होत आहे.

सोने- चांदी पुन्हा स्वस्त?

या घसरणीनंतर सोन्याचा दर 600 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होत आहे. याअगोदर म्हणजेच 2 फेब्रुवारी 2022 रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्या दिवशी सोन्याचे दर 58882 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. तर चांदी अजूनही 13207 रुपये प्रति किलो दराने त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा स्वस्त झाली आहे. चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79980 रुपये प्रति किलो इतका आहे.