Airtel Recharge : एअरटेल वापरकर्त्यांसाठी गुडन्यूज! मिळणार ‘इतका’ डेटा मोफत, कसे ते जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Airtel Recharge : आपल्या वापरकर्त्यांसाठी टेलिकॉम कंपन्या सतत नवनवीन ऑफर्स आणत असतात. सांगायचे झाले तर रिलायन्स जिओ, एअरटेल आणि Vodafone Idea मध्ये जोरदार स्पर्धा लागली आहे.

अशातच आता एअरटेल वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनी आपल्या ग्राहकांना मोफत 50GB डेटा देत आहे. हा फायदा कसा घ्यायचा ते जाणून घेण्यासाठी बातमी संपूर्णपणे वाचा.

जर तुम्हाला जाहिरातमुक्त संगीत ऐकायचे असेल तसेच तुम्हाला अनलिमिटेड ऑनलाइन म्युझिक स्ट्रीमिंग आणि ऑफलाइन म्युझिक डाउनलोड यांसारखे फायदे पाहिजे असतील, तर यासाठी तुम्ही Wynk Music अॅपचे सदस्यत्व घेऊ शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे म्हणजे जर तुम्ही या सेवेची सदस्यता घेतली तर तुम्हाला दोन प्लॅनसह अनुक्रमे 5GB आणि 50GB हाय-स्पीड डेटा फ्री मिळत आहे.

मोफत घ्या डेटाचा आनंद

जर तुम्ही एका महिन्यासाठी Wynk Music Premium चे सदस्यत्व घेतले तर तुम्हाला 5GB हाय-स्पीड डेटा मोफत देण्यात येईल. तसेच अनलिमिटेड स्ट्रीमिंग, हॅलोट्यून्स, डाउनलोड आणि जाहिरातमुक्त संगीत ऐकायला मिळेल. मोफत डेटासह हा प्लॅन एअरटेल वापरकर्त्यांसाठी 149 रुपयांऐवजी फक्त 98 रुपयांना आहे.

एका वर्षासाठी मिळणार इतका डेटा फ्री

वापरकर्त्यांनी पूर्ण वर्षासाठी विंक म्युझिक प्रीमियमचे सदस्यत्व घेतले तर त्यांना ५० जीबी हाय-स्पीड डेटा मोफत मिळेल. या सबस्क्रिप्शन प्लॅनची ​​किंमत 301 रुपये इतकी आहे .यामध्ये तुम्हाला एका वर्षासाठी म्युझिक स्ट्रीमिंग आणि मागील प्लॅनमध्ये उपलब्ध असणारे सर्व फायदे मिळतील.

पहिल्या महिन्यात मोफत वापरता येणार

सर्व एअरटेल आणि नॉन-एअरटेल वापरकर्त्यांसाठी विंक म्युझिक पहिल्या महिन्यात मोफत वापरता येणार आहे. हे सबस्क्रिप्शन घेण्यापूर्वी तुम्हाला चाचणी घ्यायची असेल तर 49 रुपयांचे फायदे विनामूल्य दिले जात आहेत.

यामध्ये ऑफलाइन गाणे डाउनलोड, जाहिरात-मुक्त संगीत, पॉडकास्ट आणि लाइव्ह शो ऐकणे आणि अनलिमिटेड स्ट्रीमिंगसोबत विशेष प्लेलिस्टचा समावेश आहे.