अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळेच नगर महापालिकेच्या मालकीचा असणार्‍या पिंपळगाव माळवीचा तलाव भरला असून सांडीवरून पाणी वाहत असल्याने या ठिकाणी पर्यटकांनासाठी नगरकरांची मोठी गर्दी होतांना दिसत आहे.

दरम्यान पर्यटकांची वाढती गर्दी पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. नगरपासून काहीश्या अंतरावर पिंपळगाव येथे महापालिकेचा विशाल तलाव असून हा तलाव मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने तुंडूब भरला असून तलावाच्या सांडीवरून पाणी वाहत आहे.

यामुळे या भागातील सौदर्य फुलले आहे. या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी मोठ्या संख्याने पर्यटक येत असून सध्या गणेशोत्सव सुरू असून रविवारी काही नगरकांनी या ठिकाणी गणपती बाप्पा विर्सजनासाठी आणले होते. दरम्यान डोंगरगण परिसारातील सौदर्य सध्या पावसामुळे खुलून गेले असून यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची या ठिकाणी गर्दी होतांना दिसत आहे.

पिंपळगाव, डोंगरगण, मांजरसुभे, गोरक्षनाथ गड ही पर्यटन आणि धार्मिक ठिकाणे आहेत. या ठकाणीही पर्यटक गर्दी करू लागले आहे. मागील आठवड्यात या ठिकाणी जोरदार पाऊस झालेला असून यामुळे या भागातील धबेधबे प्रवाहीत झाले असून ते पर्यटकांना आकर्षीत करत आहेत.

डोंगरगणला रामेश्वर हे महादेवाचे मंदीर डोंगराच्या कुशीत असून त्या ठिकाणी दाट झाडी, पाण्याचे झेर यामुळे या ठिकाणी श्रावण आणि संपूर्ण पावसाळ्यात पर्यटक आणि भाविकांची गर्दी असते. गेल्या आठ दिवसांपासून या ठिकाणी निर्सग खुलेले असून यामुळे नगरकांची दिवसभर गर्दी असल्याचे दिसत आहे.