Old Pension Scheme : पेन्शनधारकांसाठी खुशखबर! ‘या’ राज्यांमध्ये लागू झाली जुनी पेन्शन योजना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Old Pension Scheme : संपूर्ण देशभरात जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी कर्मचारी सतत आंदोलन करत आहेत. अशातच जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे.

कारण काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु केली आहे,त्यामुळे केंद्रातल्या सरकारवर दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकार पुन्हा एकदा ही योजना लागू करण्याची शक्यता आहे.

लवकरच गुजरातमध्ये निवडणुकीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जुन्या पेन्शनचे पुनरुज्जीवन हा महत्त्वाचा मुद्दा बनलाय. एकीकडे राज्यात आम आदमी पक्षाचे सरकार आले तर जुनी पेन्शन व्यवस्था पूर्ववत करण्याचे आश्वासन देऊन सरकारी कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचा मोठा खेळ केला आहे.

तर दुसरीकडे काँग्रेसनेही राज्यात आपले सरकार आले तर राजस्थान आणि छत्तीसगडच्या धर्तीवर त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले आहे. याअगोदर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने असेच आश्वासन दिले होते.

तेथे त्यांचे सरकार येताच त्यांनी जुनी पेन्शन लागू करण्याच्या आश्वासनाची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. 18 नोव्हेंबर रोजी पंजाब सरकारने या योजनेबाबत अधिसूचना जारी केलीय.

एकीकडे जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्यासाठी देशभरात कर्मचारी सतत आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे राजस्थान आणि छत्तीसगड सरकारने जुन्या पेन्शनची अंमलबजावणी सुरु करण्यास सुरुवात केली आहे. तर पंजाबमध्ये ही योजना लागू करण्याची तयारी सुरू आहे.

सरकारने NPS अंतर्गत 2010 नंतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे जुन्या योजनेच्या तुलनेत या योजनेत कर्मचाऱ्यांना खूप कमी लाभ मिळत आहे असे कर्मचाऱ्यांनी मत व्यक्त केले असून त्यांचे भविष्य सुरक्षित नाही. निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पैशावर सरकारलाच तो कर भरावा लागेल.