Infinix Zero 5G : स्मार्टफोनप्रेमींसाठी खुशखबर! Infinix ने भारतात लाँच केले दोन नवीन स्मार्टफोन
दिग्ग्ज टेक कंपनीने Infinix ने भारतात आपले दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च लाँच केले आहेत, यात 33W फास्ट चार्जिंग देखील उपलब्ध असणार आहे.
Infinix Zero 5G : टेक कंपनी Infinix मार्केटमध्ये सतत शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. अशातच आता या कंपनीने भारतात आपले दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च लाँच केले असून हा फोन इतर कंपन्यांना टक्कर देऊ शकतो. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कंपनीने यात जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन दिली आहेत.
कंपनीने आता भारतीय बाजारपेठेत Infinix Zero 5G 2023 आणि Infinix Zero 5G 2023 Turbo स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. आपल्या ग्राहकांसाठी कंपनीने या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहेत, ज्यामध्ये प्राइमरी लेन्स 50 मेगापिक्सेल आहे.
जाणून घ्या किंमत
Infinix Zero 5G 2023 च्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजची किंमत 17,999 रुपये तर Infinix Zero 5G 2023 Turbo ची किंमत 19,999 रुपये इतकी आहे. या किंमतीत, फोनला 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज दिले जाणार आहे. दोन्ही फोन कोरल ऑरेंज, पर्ल व्हाइट आणि सबमरिनर ब्लॅक कलरमध्ये खरेदी केले करता येते. हा फोन Flickart वर लिस्ट केला असून तो 11 फेब्रुवारीपासून विकला जाईल. लॉन्चिंग ऑफर अंतर्गत, Infinix Zero 5G वर 1,500 रुपये तर Infinix Zero 5G Turbo वर 2,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे.
Infinix Zero 5G सीरिजचे स्पेसिफिकेशन
स्पेसिफिकेशनचा विचार केला तर कंपनीच्या या दोन्ही फोनची फीचर्स सारखीच आहेत. या दोन्ही फोनमध्ये Android 12 आधारित XOS ऑपरेटिंग सिस्टम दिली आहे. तसेच या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे आहेत. दोन्हीकडे समान आकाराची बॅटरी असून Infinix Zero 5G 2023 Turbo मध्ये वेगळा प्रोसेसर आणि स्टोरेज आहे.
या दोन्ही फोनमध्ये Android 12 आधारित XOS 12 आहे. 6.78-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला असून ज्याचा रिफ्रेश दर 120Hz आहे. Infinix Zero 5G 2023 मध्ये MediaTek Dimensity 920 5G प्रोसेसर आहे आणि Infinix Zero 5G 2023 Turbo मध्ये MediaTek Dimensity 1080 5G प्रोसेसर दिला आहे. तसेच कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी फोनमध्ये 8 GB इनबिल्ट रॅमसह 5 GB पर्यंत आभासी रॅम उपलब्ध करून दिली आहे.
Infinix Zero 5G 2023 आणि Infinix Zero 5G 2023 Turbo मध्ये तीन मागील कॅमेरे असून ज्यात प्राथमिक लेन्स 50 मेगापिक्सेल आहे. इतर दोन लेन्स 2-2 मेगापिक्सल्सच्या आहेत. सेल्फीसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. कॅमेरासोबत सुपर नाईट मोड दिला आहे.
Infinix Zero 5G 2023 मध्ये 128 GB स्टोरेज, तर Turbo Edition मध्ये 256 GB स्टोरेज दिले आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी कंपनीने या फोनमध्ये वाय-फाय, 5जी, ब्लूटूथ, जीपीएस, 3.5 मिमी जॅक, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि हेडफोन जॅक दिले आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. Infinix Zero 5G 2023 आणि Infinix Zero 5G 2023 Turbo मध्ये 33W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी उपलब्ध करून दिली आहे.