अहमदनगर मधील महिलांसाठी आनंदाची बातमी ‘इथे’ होणार लवकरच भरती !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :-  एकात्मिक बालविकास सेवा योजना पारनेर, जि. अहमदनगर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका पदांच्या एकूण 12 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 29 जुलै 2021 पर्यंत अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी. अहमदनगरच्या जिल्ह्यातील अंगणवाडीमध्ये लवकरच पदभरती होणार आहे.

यासाथची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महिलांना या पदभरतीमध्ये रोजगाराची मोठी साधी उपलब्ध होऊ शकणार आहे.

सेविका/ मिनी सेविका आणि मदतनीस अशा जागांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑनलाईन अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2021 असणार आहे.

  • कोणत्या पदांसाठी भरती
  • अंगणवाडी सेविका
  • मिनी सेविका
  • मदतनीस

या पदभरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच स्थानिक महिलांना या भरतीमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. सविस्तर माहितीसाठी जाहिरात बघणं आवश्यक आहे.

पाठवायचा पत्ता – एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय पारनेर, पंचायत समिती पारनेर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. पिन – 414302 अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 29 जुलै 2021