WhatsApp : आनंदाची बातमी! आता व्हॉट्सअ‍ॅपचे पाठवलेले मेसेज एडिट करता येणार, जाणून घ्या अ‍ॅपबद्दल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

WhatsApp : सध्याच्या काळात व्हॉट्सअ‍ॅप हे सगळ्यात जास्त वापरले जात आहे. एखादे ऑफिसचे काम (Office work) असो किंवा ऑनलाइन क्लास (Online class) असो सगळंकाही व्हॉट्सअ‍ॅपवरून केले जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप त्यांच्या वापरकर्त्यांसाठी (WhatsApp users) सतत नवनवीन अपडेट्स आणि फीचर्स (WhatsApp Features)  लाँच करत असते, वापरकर्त्यांना आता लवकरच पाठवलेले मेसेज एडिट करता येणार आहे.

आता चुकीचा संदेश (Wrong message) डिलीट करण्याऐवजी एडिटचा पर्याय मिळेल. WaBetaInfo च्या अहवालानुसार, मेटा-मालकीची कंपनी आपल्या वापरकर्त्यांना घाईत झालेल्या चुकांपासून मुक्त होण्यासाठी संदेश संपादित करण्यास प्रारंभ करण्याचा पर्याय देईल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअ‍ॅप सध्या त्याच्या प्रक्रियेवर काम करत आहे. हे फीचर कसे काम करेल हे सध्या माहित नाही. अशा मेसेजसह व्हॉट्सअ‍ॅप एडिट हिस्ट्रीचा (WhatsApp Edit History) पर्याय दाखवेल अशी शक्यता आहे. तसेच, पाठवलेला संदेश मर्यादित काळासाठी संपादित करण्याचा पर्याय देऊ शकता.

Wabetainfo च्या ताज्या अहवालानुसार, WhatsApp केप्ट मेसेजेसवर देखील काम करत आहे, जे सध्या विकासाच्या टप्प्यात आहे. या नवीन फीचरद्वारे यूजर्स ‘केप्ट मेसेजेस’ अंतर्गत कोणताही मेसेज सेव्ह करू शकतात.