Jio True 5G : खुशखबर! आता ‘या’ वापरकर्त्यांना मिळणार 5G सेवा

Jio True 5G : काही दिवसांपूर्वी जिओने आपल्या वापरकर्त्यांसाठी 5G सेवा सुरु केली आहे. यामुळे आता वापरकर्त्यांना अमर्यादित हाय स्पीड डेटा मिळत आहे.

अशातच आता iPhone वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता जिओ ने iPhone साठी 5G नेटवर्क सादर केले आहे. त्यामुळे आता iPhone वापरकर्त्यांना हाय स्पीड डेटा मिळणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आयफोन 12 आणि त्यानंतरचे सर्व आयफोन वापरकर्ते जिओच्या वेलकम ऑफरसाठी पात्र असणार आहेत. म्हणजेच, त्यांना अनलिमिटेड 5G डेटा विनामूल्य प्रवेश मिळणार असल्याचे जिओने सांगितले आहे.

त्यामुळे आता या ऑफर्स अंतर्गत 1GBPS पर्यंत स्पीड आणि अनलिमिटेड 5G डेटा वापरण्यास सक्षम असतील. Jio ने सध्या सर्व्हिस-ऑन-इनव्हिटेशन फेजवर 5G सेवा सादर केली असून सध्याच्या Jio वापरकर्त्यांपैकी निवडक वापरकर्त्यांना ही सेवा वापरण्यासाठी आमंत्रणे पाठवली जात आहेत.

वापरकर्त्यांसाठी Apple ने नुकतेच जारी केलं अपडेट

Apple ने 13 डिसेंबर रोजी भारतीय वापरकर्त्यांसाठी 5G नेटवर्कचा सपोर्ट जारी केला आहे. भारतातील आयफोन वापरकर्ते ज्या भागात त्याचे कव्हरेज उपलब्ध आहे तेथे 5G नेटवर्कचा लाभ घेता येईल. तसेच 2020 किंवा नंतर लाँच झालेल्या सर्व iPhones वर 5G वापरता येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

या iPhone वापरकर्त्यांना मिळणार Jio True 5G

Jio True 5G हे Apple च्या iPhone 12 आणि त्यानंतरच्या सर्व मॉडेलमध्ये वापरला जाऊ शकतो. या मॉडेल्समध्ये iPhone SE (2022), iPhone 12 mini, iPhone 12 Pro, iPhone 12, iPhone 12 Pro Max, iPhone 13 mini, iPhone 13, iPhone 13 Pro Max, iPhone 13 Pro, iPhone 14 Pro Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Plus चा iPhone 14 मध्ये समावेश आहे.