Gram panchayat Election Result 2022 Live Updates : आ.बबनराव पाचपुतेंना मोठा धक्का! कुटुंबातील व्यक्तीनेच हरवलं !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gram panchayat Election Result 2022 Live Updates : Live Updates तुम्हाला ह्या पेजवर वाचायला मिळतील

लास्ट अपडेट : (लाईव्ह अपडेट्स साठी पेज रिफ्रेश करा, अथवा थोड्यावेळानंतर पुन्हा व्हिझिट करा)

माजीमंत्री बबनराव पाचपुते गटाला धक्का देत त्यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी सरपंच पदाची निवडणुक जिंकली तर आमदार पाचपुते यांचे चिरंजीव प्रतापसिंह पाचपुते यांना पराभवाचा धक्का बसला आहे. काष्टीत १७ पैकी पाचपुते गटाला १० जागा मिळाल्या आहेत.

बेलवंडी मध्ये मात्र विखे समर्थक आण्णासाहेब शेलार यांचे चिरंजीव ऋषिकेश शेलार सरपंच पदावर विजयी होत गावात विरोधी पॅनलचा धुव्वा उडवला इथे १८ जागा शेलार गटाने जिंकल्या.

1.52 PM : बाळासाहेब थोरातांच्या ग्राम पंचायतीत विखे पाटलांनी सरपंच पद जिंकल !

1.23 PM : संगमनेर तालुक्यातील 04 ग्रामपंचायती कॉग्रेसकडे, संगमनेर तालुक्यात विखे-थोरातांची प्रतिष्ठापणाला, 37 ग्रामपंचायतीपैकी 14 ग्रामपंचायतीत विखे-थोरात गटात मोठी चुरस.

राजुरी : विखे गटाच्या जनसेवा मंडळाचे डॉ. सोमनाथ गोरे गटाला सरपंच पदासह 10 जागा मिळाल्या

श्रीगोंदा तालुका निकाल : 
घोगरगाव – सरपंच – सुजाता मिलिंद भोसले (विजयी)
माठ – सरपंच- अरुण विश्वनाथ पवार- ३९५ मतांनी विजयी.
थिटे सांगवी- सरपंच- अर्जुन रामचंद्र शेळके- ४०२ मतांनी विजयी.
चवरसांगवी- सरपंच- सुनिता माळशिकारे- १७ मतांनी विजयी.
तरडगव्हाण- सरपंच- कुंदा बेरड राजेंद्र – ७ मतांनी विजयी.

पाथर्डी तालुका निकाल :

सोनोशी – गोकुळ दौंड यांचा पॅनल सरपंचपदा सहित विजयी.
कोळसांगवी – सरपंच उमेदवार सुरेखा युवराज फुंदे विजयी
वडगावं – आजीनाथ विश्वनाथ बडे सरपंच पदी विजयी
मोहरी – आशाबाई पोपट वाल्हेकर सरपंचपदी विजयी, कल्पजित डोईफोडे यांच्या पॅनलचा सरपंच पदाच्या उमेदवारासह पराभव
जिरेवाडी – मुकुंद आंधळे गटाच्या प्रहार जनशक्ती मंचच्या लक्ष्मी महादेव आंधळे सरपंच पदाच्या उमेदवार विजयी
वैजू बाभळगाव – ज्योती घोरपडे अपक्ष सरपंचपदी विजयी

पारनेर तालुका निकाल

पिंपळगाव तुर्क: सरपंच पदी सुलेचना सावकार शिंदे ४७ मतांनी विजयी !

पाडळी तर्फे कान्हुर-सरपंच पदी इंदुबाई शंकर सिनारे विजयी !
निघोज ग्रामपंचायत : सत्ताधारी जनसेवा मंडळ : सहा सदस्य व सरपंच पद राखले!
भोंद्रे :सरपंच पदी गणेश (अभिजीत) सूर्यभान झावरे विजयी !

सिद्धेश्वर वाडी – सरपंच पदी शितल संतोष कावरे विजयी !
करंदी : सरपंच नंदा भास्कर गव्हाणे विजयी !
पुणेवाडी – सरपंच दिपाली मारूती रेपाळे ९३ मतांनी विजयी !

गुणोरे – सरपंच पदी सुरेश ढवळे १०६ विजयी !
चोंभुत : सरपंच पदी कांचन म्हसके दोन मतांनी विजयी!
कोहकडी -सरपंच सिमा अरूण पवार यांचा विजय !

गोरेगाव -सरपंच सुमन बाबासाहेब तांबे १४५ मतांनी विजयी !
हत्तलखिंडी : आमदार निलेश लंके समर्थक महेंद्र गायकवाड सरपंच पदी विजयी !
पळशी – प्रकाश राठोड विजयी : अप्पासाहेब शिंदे पराभुत !

वनकुटे – डाॅ.नितीन रांधवण विजयी अ‍ॅड राहुल झावरे पराभुत !
ढवळपुरी : डाॅ.राजेश भनगडे यांचा पराभव भागा गावडे विजयी!

अहमदनगर जिल्ह्यातील 188 सरपंचांची आज थेट जनतेतून निवड होणार असून कोणाच भाग्य उजळत सरपंच पदाची माळ गळ्यात पडणार हे दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.

आज मंगळवारी 195 ग्रामपंचायतींची मतमोजणी होत आहे. रविवारी जिल्ह्यातील 195 ग्रामपंचायतींसाठी 82 टक्के मतदान झाले होते. ग्रामीण भागात उत्साहाने मतदारांनी मतदानात सहभाग घेत लोकशाही साजरी केली आहे.

सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. त्यामुळे आजच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय.