Xiaomi : शानदार ऑफर!! 18 मिनिटांत चार्ज होणाऱ्या 5G फोनवर मिळतेय 29,000 रुपयांची सूट

Xiaomi : शाओमीने 24 एप्रिल रोजी Xiaomi 12 Pro हा स्मार्टफोन लाँच केला होता. अशातच आता कंपनीच्या वेबसाइटवर या स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर मिळत आहे.

स्टोरेजचा विचार केला तर यामध्ये 8GB + 256GB स्टोरेज मिळत आहे. हा स्मार्टफोनची किंमत 79,999 रुपये इतकी आहे, परंतु ऑफरमुळे तो 55,999 रुपयांना मिळत आहे.म्हणजे यावर एकूण 29,000 रुपयांची सूट मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

कंपनी या स्मार्टफोनमध्ये 3200×1440 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.73-इंच 2K AMOLED डिस्प्ले देत असून याचा टच सॅम्पलिंग रेट 480Hz आहे आणि तो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच कंपनी त्यात डिस्प्लेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कंपनी त्यात HDR10+ आणि डॉल्बी व्हिजन देत आहे. यासोबतच डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी तुम्हाला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस मिळेल.

यामध्ये 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंत UFS 3.1 अंतर्गत स्टोरेज आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी यात Snapdragon 8 Gen 1 चिपसेट देत आहे. तसेच फोनच्या मागील बाजूस फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह तीन 50-मेगापिक्सेल कॅमेरे दिले आहेत. तर सेल्फीसाठी कंपनी या फोनच्या फ्रंटमध्ये 32-मेगापिक्सलचा कॅमेरा कंपनीने दिला आहे.

इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर आणि एआय फेस अनलॉकही कंपनीने दिला आहे. तर फोनमध्ये 4600mAh बॅटरी असून ती 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या चार्जिंगच्या बूस्ट मोडमध्ये फोन 18 मिनिटांत पूर्ण चार्ज तर स्टँडर्ड मोडमध्ये चार्ज होण्यासाठी 24 मिनिटे लागतात. चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 12 वर आधारित MIUI 13 वर काम करतो.