Health Tips : रात्री झोपण्याआधी सेवन करा या पदार्थांचे ! होइल जबरदस्त फायदे…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- » मनुका : – यामध्ये मॅमेशियम, पोटॅशियम, लोह खूप प्रमाणात असते. मनुक्‍यांचं नियमित सेवन करण्याने कर्करोगाच्या पेशीची वाढ रोखण्यास मदत होते.

यामुळे आपली त्वचा चमकदार आणि निरोगी राहाते. अनिमिया आणि किडनी स्टोनच्या रुग्णांसाठी ही मनुका फायदेशीर असतात.

» आख्खे मूग : – मुगात प्रथिनं, फायबर आणि ब जीवनसत्त्व समृद्ध प्रमाणात असते. मुगाचं नियमित सेवन अपचनाची समस्या असणाऱ्या रूग्णांसाठी खूप फायदेशीर ठरते. मुगामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असण्याने उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना फायदा होतो. म्हणून उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना नियमितपणे आख्खे मूग खाण्याचा सल्ला दिला जातो.

» काळे चणे : – मोड आलेल्या काळ्या चण्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे अपचनाची समस्या दूर होण्यास मदत होते. यामध्ये प्रथिन भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे स्नायू बळकट होण्यास मदत होते. काळ्या चण्याची नियमित सेवन करण्याने थकवा दूर होतो.

» बदाम : – बदामामध्ये मॅग्नेशियम असते आणि हे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. संशोधनात हे सिद्ध झाले की, नियमितपणे भिजवलेले बदाम खाण्याने वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएलची पातळी कमी होण्यास मदत होते.

» मनुके : – मनुक्‍यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. शरीराला पुरेशा प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स मिळण्यासाठी एक रात्र आधी भिजवलेल्या मनुक्‍यांचं नियमित सेवन करा.

नियमितपणे मनुक्‍यांचं सेवन करण्याने त्वचा निरोगी आणि चमकदार होते. यामध्ये लोह असते. म्हणून मनुक्‍यांचं नियमित सेवन करण्याचा सल्ला ऑनिमियाच्या रुगणांना दिला जातो.