Hero Bike : होंडाचे टेन्शन वाढवणार हिरोची ‘ही’ शानदार मायलेज असणारी बाईक, यापूर्वी कंपनीने केली होती बंद; जाणून घ्या किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hero Bike : जर तुम्ही नवीन बाईक खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता मार्केटमध्ये लवकरच एक शानदार मायलेज असणारी बाईक लाँच होणार आहे. होंडाचे टेन्शन वाढवण्यासाठी आता हिरोची हिरो पॅशन प्लस बाईक लाँच होणार आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीने यापूर्वी ही बाईक बंद केली होती. कंपनी आपली आगामी बाईक लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनी यात जबरदस्त मायलेज आणि फीचर्स देणार आहे. जाणून घेऊयात या बाईकबद्दल सविस्तर.

बंद केले होते मॉडेल

कंपनी आता 100cc इंजिनसह पॅशन प्लस आणत असून हे लक्षात घ्या की कंपनीला यापूर्वी म्हणजेच 2019 मध्ये पॅशनचे प्लस मॉडेल बंद करावे लागले होते. या मॉडेलची मागणी कमी झाली असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला होता. यात 100cc इंजिन उपलब्ध होते.

तर 110cc इंजिन त्याच्या नियमित मॉडेल आणि प्रो मॉडेलमध्ये उपलब्ध होते. अशातच आता कंपनी पुन्हा एकदा मोटरसायकल धुमाकूळ घालण्यास सज्ज झाली आहे. आता या मोटरसायकलची थेट स्पर्धा Honda CB Shine 100 शी होणार आहे.

असे असणार इंजिन

कंपनीसाठी हिरो पॅशन प्लस हे नवीन फ्लॅगशिप मॉडेल असू शकते. जी Splendor Plus HF Deluxe आणि HF 100 च्या बरोबरीने राहू शकते. यात 97.2cc इंजिन असेल जे 8000 RPM वर 7.91 bhp पॉवर आणि 6000 RPM वर 8.05 Nm टॉर्क जनरेट करेल. हे इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. त्याचे मायलेजही उत्कृष्ट असू शकते.

असणार ही वैशिष्ट्ये

या मोटरसायकलची वैशिष्ट्यांची यादी मानक पॅशन 110 सारखी असण्याची शक्यता आहे. मोबाईल चार्जिंग पोर्टसह सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यात तुम्हाला पाहायला मिळेल. स्क्वेरिश एलसीडी डिस्प्लेसह अॅनालॉग स्पीडोमीटर यात अपेक्षित आहे. हा डिस्प्ले ओडोमीटर रीडिंग, ट्रिप मीटर, इंधन गेजसह इतर अनेक तपशील दर्शवणार आहे.