Hyundai Ioniq 5 : इलेक्ट्रिक कारच्या जगात धुमाकूळ घालायला येतेय ह्युंदायची Ioniq 5, ‘या’ दिवशी होणार लाँच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hyundai Ioniq 5 : ह्युंदाई ही दक्षिण कोरियाची आघाडीची कार निर्माता कंपनी आहे. ही कंपनी नवीन इलेक्ट्रिक कार Hyundai IONIQ 5 भारतीय बाजारपेठेत लॉन्च करणार आहे.

काही दिवसांपूर्वी कंपनीने आंतरराष्‍ट्रीय बाजारात सादर केली होती. ही कार बाजारात असलेल्या इतर कारला कडवी टक्कर देईल. जाणून घेऊयात या कारचे फीचर्स आणि किंमत

कंपनी भारतीय मार्केटसाठी नवीन ईव्ही प्लॅटफॉर्म सादर करणार असून ज्याचे नाव ई-जीएमपी (इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म) आहे. कंपनीचे हे मॉडेल या प्लॅटफॉर्मवर बनवलेले पहिले इलेक्ट्रिक कार असणार आहे. यापूर्वी ही कार जागतिक बाजारपेठेत सादर केली होती. तांत्रिकदृष्ट्या विचार केला तर किआच्या पहिल्या इलेक्ट्रिक कार EV6 सारखी आहे.

लूक आणि डिझाईन

या नवीन कारच्या लुक आणि डिझाईनबद्दल सांगायचे झाले तर, नवीन Ioniq 5 ला अतिशय भविष्यवादी बाह्य प्रोफाइल आहे. ज्यामध्ये चौकोनी DRL सह त्याचे एलईडी हेडलॅम्प, 20-इंच एरोडायनॅमिकली-डिझाइन केलेले अलॉय व्हील्स, फ्लश-फिटिंग डोअर हँडल, एक इंटिग्रेटेड स्पॉयलर, पिक्सेलेटेड एलईडी टेललाइट्स तसेच शार्क-फिन अँटेना यांचा समावेश आहे.

कंपनीच्या सध्याच्या मॉडेल लाइनअपपेक्षा तिचे स्वरूप खूपच वेगळे असल्याने ती पोर्टफोलिओमधील सर्वात सुंदर दिसणारी कार आहे.

केबिन आणि फीचर्स

कारच्या आतमध्ये डॅशबोर्डवर एक मोठा कन्सोल, इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी एक-एक स्क्रीन आहे. तर इतर केबिन हायलाइट्समध्ये दोन-स्पोक फ्लॅट-बॉटम स्टिअरिंग व्हील, दुसऱ्या रांगेसाठी अॅडजस्टेबल सीट आणि स्लाइडिंग सेंटर कन्सोलचा यामध्ये समावेश आहे.

लेव्हल-2 ADAS फीचर

कंपनीने त्यांच्या नवीन कारमध्ये 21 Hyundai SmartSense (Hyundai SmartSense) लेव्हल-2 ADAS फीचर ऑफर करेल. या फीचरसह या कारमध्ये एक स्मार्ट आणि अंतर्ज्ञानी ड्रायव्हिंग अनुभव देईल. जे रस्त्यावरील अडथळे किंवा ड्रायव्हरच्या चुका शोधून त्यांचा प्रभाव टाळण्यासाठी पावले उचलतील.

यासाठी रडार, सेन्सर आणि कॅमेरे असलेले ऑटोमॅटिक सेन्सिंग तंत्रज्ञान वापरले असून Hyundai SmartSense समोर कॅमेरा, फ्रंट रडार आणि मागील रडार यांसारख्या साधनांनी परिपूर्ण आहे. तसेच नवीन ADAS फंक्शन्स देखील समाविष्ट असतील थोडक्यात सांगायचे झाले तर सुरक्षित एक्झिट असिस्ट (SEA) आणि रिअर ऑक्युपंट अलर्ट (ROA).

बॅटरी पॅक आणि अपेक्षित किंमत

आंतरराष्ट्रीय-स्पेक मॉडेलला RWD किंवा AWD दोन्ही कॉन्फिगरेशनमध्ये 58kWh आणि 72.6kWh बॅटरी पॅक मिळतात. भारतीय बाजारपेठेत कोणता पॅक ऑफर केला जाईल याची माहिती अजूनही समोर आली नाही.

हे भारतातील सर्वात महागडे मॉडेल बनू शकते. या कारची अंदाजे किंमत 50 लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकते. लॉन्च केल्यावर कार EV6 तसेच Volvo XC40 रिचार्जसह इतर अनेक ईव्हीला टक्कर देईल.