Health Tips : नाश्त्यामध्ये खात असाल ‘हा’ पदार्थ तर आजच टाळा, नाहीतर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Health Tips : अनेकजण सकाळी नाश्ता करतात. परंतु, काहीजण नाश्त्यामध्ये पांढरे ब्रेड खातात. हे ब्रेड आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतात.

यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता खूप जास्त असते. तसेच पांढऱ्या ब्रेडमुळे मधुमेह होण्याची शक्यता असते. त्यामुळे पांढरे ब्रेड खाऊ नये नाहीतर त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

पोषणाचा अभाव

अनेकांना पांढऱ्या ब्रेडपासून बनवलेल्या गोष्टी चवदार वाटतात, परंतु, शरीराला पोषक ठरण्यासाठी हा उत्तम पर्याय नाही. कारण ब्रेड बनवण्याच्या प्रक्रियेत पिठाचे पौष्टिक मूल्य कमी होते आणि ते रिफाइंड पिठापासून बनवलेले असते. त्यामुळे पचन आणि वजनाच्या समस्या वाढू शकतात. पांढरे ब्रेड खाल्ले तर साखरेची पातळी वाढण्याचा धोकाही असतो.

मधुमेहाचा धोका

पांढऱ्या ब्रेडमध्ये फायबर तसेच प्रोटीनचे प्रमाण खूप कमी प्रमाणात असते, त्यामुळे व्हाईट ब्रेड लवकर पचते आणि शोषण्याची प्रक्रिया जलद होते. रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. एका संशोधनात असे दिसून आले आहे की ब्रेडसारखे प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाणाऱ्या लोकांना टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो.

वजन वाढण्याची शक्यता

पांढऱ्या ब्रेडसारखे कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाणे टाळावे कारण यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे हे आरोग्यासाठी हानिकारक असल्याने असल्याने, ब्रेड खाऊ नये.

कोणते ब्रेड चांगले

आहारात ग्रेन ब्रेडचा समावेश करावा. कारण पिठापासून बनवलेल्या ब्रेडमुळे शरीराला काम करण्याची शक्ती मिळते, परंतु गव्हाच्या पिठात फायबर आणि इतर अनेक घटक असतात. ग्रेन ब्रेडसोबत फ्रूट-सलाड आणि दुग्धजन्य पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश करणे गरजेचे आहे.