Sunroof Care Tips : तुमच्याही कारमध्ये असेल सनरूफ तर ‘या’ पद्धतीने घ्या काळजी, नाहीतर..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sunroof Care Tips : ग्राहकांच्या मागणीनुसार आता अनेक कंपन्या शानदार फीचर्स असणाऱ्या कार सादर करत आहेत. नवनवीन फीचर्समुळे आता कंपन्यांनी त्यांच्या सर्वच कारच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता नवीन कार घेण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत.

अशातच आता मार्केटमध्ये कंपन्या सनरूफ असणाऱ्या कार्स लाँच करत आहेत. परंतु, काही ग्राहक सनरूफ असणाऱ्या या कारची व्यवस्थित देखभाल करत नाहीत. त्यामुळे अशी कार लवकर खराब होते शिवाय तुम्हाला आर्थिक ताण सहन करावा लागतो. त्यामुळे तिच्या देखभालीकडे दुर्लक्ष करू नका.

सनरूफ कारला आहे मोठी मागणी

सध्याच्या काळात सनरूफ फीचर्ससह कार घेण्यास जात पसंती दिली जात आहे. त्यामुळे कंपन्यांकडून कारमध्ये विविध आकाराचे सनरूफ दिले जातात.

निष्काळजीपणामुळे होते नुकसान 

अशी फीचर्स असणारी कार आता ग्राहकांकडून खरेदी केल्या जातात, परंतु बहुतेक जणांना तिच्या देखभालीचे योग्य ज्ञान नसते. त्यामुळे एकतर काही वेळाने सनरूफ खराब होते किंवा निष्काळजीपणामुळे त्याचेही नुकसान होते.

कंपनीकडून घ्या सविस्तर माहिती

जर तुमच्याकडेही सनरूफ असणारी कार असल्यास ती योग्य प्रकारे ठेवण्याबाबत कंपनीच्या तज्ञांकडून माहिती घ्या. तसेच कारच्या मॅन्युअलवर कारच्या सर्व पार्ट्सची माहितीही दिली जाते. ज्यामध्ये सनरूफचीही माहिती आहे. ते वाचून तुम्ही नुकसान टाळू शकता.

स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे

जर तुम्ही सनरूफ असणारी कार वापरत असल्यास तिची साफसफाई करणे खूप गरजेचे आहे. सनरूफला आतून आणि बाहेरून स्वच्छ ठेवले तर दीर्घकाळ त्रास होत नाही. तसेच सर्व्हिस सेंटरमध्ये कारची सेवा घेताना सनरूफही तपासता येतो.

नियमितपणे करा वापर

अनेकजण सनरूफ असणारी कार खरेदी केली तर काही काळानंतर पूर्णपणे वापरणे बंद करतात. त्यामुळे ते लवकर खराब होते. यासाठी सनरूफचा नियमित वापर करावा. काही दिवसात उघडणे आणि बंद होणे यामुळे त्याची मोटर चालू राहते. तसेच वापर न केल्यास, माती गोठते आणि नंतर सनरूफ उघडण्यास त्रास होतो.

छतावर भार टाकणे टाळावे

जर तुमच्या कारमध्ये सनरूफ किंवा पॅनोरॅमिक छप्पर असेल तर, छतावर जास्त भार टाकला तर ते खराब होते. तर दुसरीकडे, सनरूफ असणाऱ्या कारचे छप्पर सनरूफ नसणाऱ्या कारच्या छतापेक्षा किंचित कमी मजबूत असते. सनरूफ असणाऱ्या कारच्या छतावर जास्त वजन ठेवले तर नुकसान होण्याचा धोका जास्त असतो.