Sanjay Raut : “काही दिवसात लोक गजानन कीर्तिकरांना विसरतील”; संजय राऊतांचा टोला

Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांना ठाकरे गटाला धक्का देत शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत गजानन कीर्तिकारांना टोला लगावला आहे.

खासदार गजानन कीर्तीकर यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने ते ठाकरे गटाच्या निशाण्यावर आले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी किर्तीकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

संजय राऊत म्हणाले की, जेव्हा एखादी व्यक्ती पक्षातील सर्व महत्त्वाची पदे आणि लाभ घेऊन निघून जाते, तेव्हा त्याच्या पक्षावरील निष्ठेचा प्रश्न निर्माण होतो. संजय राऊत म्हणाले की, ते पाच वेळा आमदार होते, दोन वेळा खासदार होते, मंत्रिपदही दिले होते.

मग त्यांना अजून काय हवं होतं? वयाच्या या टप्प्यावर त्यांनी पक्ष सोडणे दुर्दैवी आहे. मला तुरुंगात टाकण्यात आले, मी तीन महिने तुरुंगात राहिलो, तेही विनाकारण मी पक्ष सोडला नाही, असे संजय राऊत म्हणाले.

संकटसमयी जो पक्ष आणि कुटुंबाच्या पाठीशी उभा राहतो तोच खरा निष्ठावंत. काही दिवसात लोक गजानन कीर्तिकरांना विसरतील, असे संजय राऊत म्हणाले.

वडिलांनी पार्टी सोडली पण मुलगा आमच्यासोबत

गजानन कीर्तीकर यांनी उद्धव ठाकरे गट सोडला असला तरी त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर अजूनही आमच्यासोबत असल्याचे संजय राऊत म्हणाले. अमोलने वडिलांनाही समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते काही समजायला तयार नव्हते. गजानन कीर्तिकर निवडणूक जिंकून परत येणार नाहीत.

एकनाथ शिंदे गटाचे किती लोक निवडणुकीत विजयी होतात हेही पाहतो. आमच्या पक्षाचे चिन्ह हिसकावले, नाव हिसकावले असे संजय राऊत म्हणाले.

असे असतानाही अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना ६८ हजार मते मिळाली. यावरून जनतेचा पाठिंबा आमच्या पाठीशी असल्याचे दिसून येते.