अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर येथील डॉ.विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नेहमीच आरोग्य विषयक स्त्युत्य उपक्रम राबवत असतात. या महाविद्यलयातील औषधशास्त्र विभागाच्यावतीने मधुमेह-आधुनिक उपचार या विषयावरील कार्यशाळेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते.

या कार्याशाळेमध्ये महाराष्ट्रातील प्रख्यात मधुमेहतज्ञ डॉ.दीपक भोसले (औरंगाबाद), डॉ.राजीव कोविल (मुंबई), डॉ.अभिजित मुगलीकर (लातूर) व नगरचे डॉ.भारत साळवे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत राज्यातील 160 डॉक्टरांनी सहभाग घेतला. अध्यक्षीय भाषणात अधिष्ठाता डॉ.सुनिल म्हस्के

यांनी मधुमेह आजाराविषयी समाज प्रबोधन गरजेचे असल्याचे सांगितले. या कार्यशाळेची सुरुवात करतांना औषधशास्त्र विभागप्रमुख डॉ.प्रकाशचंद्र गाडे यांनी भारतातील वाढती मधुमेह रुग्णांची संख्या आणि मधुमेहामुळे होणारे आरोग्यावरील दुष्परिणाम या विषयी मार्गदर्शन केले.

सहयोगी प्रा.डॉ.बळवंत चौरे यांनी मधुमेह हा आजार का व कसा होतो, या विषयी मार्गदर्शन केले. प्रा.डॉ.किरण वाकडे यांनी मधुमेहावरील उपलब्ध विविध औषधांच्या उपयोगिततेबाबत सखोल विश्लेषण केले. डॉ.दीपक भोसले यांनी मधुमेहावरील ‘आधुनिक इन्सुलीन उपचार’ पद्धती विषयी सखोल मार्गदर्शन केले.

डॉ.भारत साळवे यांनी अमेरिकन डायबेटिक असोसिएशन आणि रिसर्च सोसायटी फॉर द स्टडी ऑफ डायबिटीस इन इंडिया यांच्या मधुमेह उपचार पद्धती विषयी मार्गदर्शन केले. डॉ.अभिजित मुगलीकर यांनी मधुमेहावरील अद्यावत उपचार पद्धतीबाबत माहिती दिली.

डॉ.राजीव कोविल यांनी मधुमेह उपचारामधील कटीन्यूअस ग्लुकोज मॉनिटरिंगचे महत्व पटवून सांगितले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ.जहीर मुजावर यांनी केले तर व आभार डॉ.विजय कुमार यांनी मानले. या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडून डॉ.संदिप कडू, डॉ.प्रितेश राऊत यांची निरिक्षक म्हणून नेमणुक करण्यात आली होती.

या कार्यशाळेसाठी डॉ. विखे पाटील मेडिकल फाऊंडेशनचे संचालक डॉ.खा.सुजय विखे पाटील, उपसंचालक डॉ.अभिजित दिवटे, सरचिटणीस डॉ.बी.सदानंदा आणि अधिष्ठाता डॉ.सुनिल म्हस्के यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.