कोरोना काळात ही वनस्पतीं ठरते उपायकारक, जाणून घ्या काय आहेत फायदे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- मागील एक वर्षांपासून कोरोना विषाणूने देशासह जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिक आता आरोग्याबाबत अधिक सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ज्यांना मधुमेह किंवा ब्लड प्रेशरसारखे आजार आहेत, अशा लोकांना कोरोनाचा धोका अधिक असल्याचे समोर येत आहे. अशा स्वरूपाच्या व्याधी असणाऱ्या लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी असते.

त्यामुळे नागरिकामंध्ये कोरोनाबाबत अधिकच धास्ती वाढली आहे. दरम्यान या कोरोना काळात बचावासाठी अनेकांनी घरगुती. उपायांनाच प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. काही जण गरम पाण्याची वाफ घेतात, काही काढे करून पितात, तर अनेकजण गुळवेलचा काढा घेत आहेत.

या काळात गुळवेळाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. यामागील कारणही तसेच आहे. गुळवेल हि औषधी वनस्पती असल्याने सर्दी पासून ते डायबीटीजपर्यंतच्या आजारांवर गुणकारी ठरत आहे. तसेच गुळवेलाचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मोठी मदत होत आहे.

गुळवेल ही एक औषधी वेल मानली जाते. जिच्यात वेगवेगळे रासायनिक घटक आहेत. जसे की ग्लुकोसाईड, गिलोइमन, ग्लूकोसीन, स्टार्च इत्यादी रासायनिक घटक गुळवेलमध्ये आढळुन येत असता, हि वेळ शेतात लिंबाच्या झाडावर आढळून येते.

गुळवेल या औषधी वनस्पतीचे जसे अनेक फायदे आहेत त्याप्रमाणेच या वनस्पतीचे काही तोटे देखील आहेत. या वनस्पतीचे सेवन करण्याआधी आपण तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यांच्या सल्ल्यानुसारच आपण तिचे सेवन करायला हवे जेणेकरून आपल्याला हानी पोहचणार नाही. गुळवेलचा घरगुती काढा करण्याची पद्धत पुढील प्रमाणे आहे.

या वनस्पतीचे १ पान घ्या, त्याच्या बारीक – बारीक आकाराच्या चकत्या तयार करा, मग त्या स्वच्छ पाण्याने धूवून घ्या. त्यानंतर एका पातेल्यात २ ग्लास पाणी उकळत ठेवा, या उकळत्या पाण्यात गुळवेलाच्या चकत्या टाका.

साधारण ५ ते १० मिनिट उकळल्यानंतर तुम्ही हा काढा रोज सकाळी उपाशीपोटी घ्यायचा आहे. ज्यामुळे आपले आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल.