Income Tax Rules : अरे वा .. आता चक्क क्रेडिट कार्ड आणि UPI च्या मदतीने भरता येणार इनकम टॅक्स ; जाणून घ्या कसं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Income Tax Rules :  जर तुम्ही अद्याप तुमचा आयकर (income tax) जमा केला नसेल आणि तुमच्या खात्यातील (account) पैसे (money) संपले असतील तर आता तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही.

कारण तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे (credit card) तुमचे आयकर रिटर्न (income tax return) देखील भरू शकता. करदात्यांची (taxpayers) सोय लक्षात घेऊन आयकर विभागाने (Income Tax Department) आता क्रेडिट कार्डद्वारेही कर जमा करण्याची सुविधा सुरू केली आहे.

आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर (e-filing portal) ई-पे टॅक्स सेवेचा (e-Pay Tax service) विस्तार करण्यात आला आहे. या सुविधेच्या मदतीने करदाते क्रेडिट कार्ड (credit card), डेबिट कार्ड (debit card) , यूपीआयच्या (UPI) मदतीने कर जमा करू शकतात.

कन्व्हेयन्स फी भरावी लागेल
क्रेडिट कार्ड आणि यूपीआयच्या मदतीने कर जमा करण्याची सुविधा सुरू केल्याने करदात्यांना मोठा दिलासा मिळेल. तथापि, क्रेडिट कार्डद्वारे कर भरल्यास 1% सुविधा शुल्क आकारले जाईल. क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी 0.85 टक्के व्यवहार शुल्क आहे. याशिवाय जीएसटीही वेगळा भरावा लागतो.

पॅन नंबरसह लॉग इन करा
तज्ञाने सांगितले की, पूर्वी कर जमा करण्यासाठी एनएसडीएलच्या (NSDL) वेबसाइटला भेट द्यावी लागायची. पण आता ई-पे टॅक्सची सुविधा आयकर विभागाच्या स्वतःच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. येथे तुम्हाला मोबाईल नंबर (mobile number) आणि पॅन कार्ड नंबर (PAN card number) टाकून लॉग इन करावे लागेल. पुढे, सर्व प्रकारची माहिती भरावी लागेल आणि शेवटी पैसे भरण्याचे अनेक पर्याय देण्यात आले आहेत.

UPI च्या मदतीने आयकर देखील भरता येतो
RuPay डेबिट कार्ड, BHIM UPI आणि UPI QR कोड वापरून केलेल्या पेमेंटवर कोणतेही व्यवहार शुल्क आकारले जाणार नाही. CBDT म्हणजेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी ई-पे सेवेचे पर्याय विस्तारित केले आहेत.