IND vs BAN: अर्रर्र .. टीम इंडियात ‘या’ स्टार खेळाडूचे कमबॅक अशक्य! रोहित शर्माने एकही सामन्यात दिली नाही संधी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IND vs BAN: भारतीय संघ 4 डिसेंबर म्हणजेच रविवारपासून बांगलादेश दौऱ्याला सुरुवात करणार आहे. या दौऱ्यामध्ये भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध तीन वनडे आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

यासाठी भारतीय संघाने जोरदार तयारी देखील सुरु केली आहे. मात्र या वेळी भारतीय संघाचा सुपर स्टार आणि अनुभवी वेगवान गोलंदाजला संघात संधी मिळणार नाही आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आता पर्यंत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या सुपर स्टारने एकही सामना खेळाला नाही आहे. त्यामुळे आता त्याचा भारतीय संघात कमबॅक होऊ शकत नाही अशी चर्चा सध्या जोराने होत आहे.

रोहितच्या संघात स्थान नाही 

कसोटी क्रिकेटमध्ये मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज सारखे खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत, त्यामुळे वेगवान गोलंदाज इशांत शर्मा संघातून गायब झाला आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतही इशांत शर्माला आपले स्थान निर्माण करता आलेले नाही.

इशांत शर्माने नोव्हेंबर 2021 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. या सामन्यात टीम इंडियाची कमान अजिंक्य रहाणेच्या हाती होती. टीम इंडियासाठी 100 हून अधिक कसोटी खेळल्या इशांत शर्माने 2007 साली टीम इंडियासाठी पहिला कसोटी सामना खेळला होता. त्याने टीम इंडियासाठी 100 हून अधिक कसोटी सामने खेळले आहेत.

इशांत शर्माने भारतासाठी 105 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर 311 विकेट्स आहेत. इशांत शर्मा आत्तापर्यंत 80 एकदिवसीय सामने खेळला आहे, ज्यामध्ये तो 115 विकेट घेण्यात यशस्वी ठरला, जरी T20 क्रिकेटमध्ये इशांत शर्मा इतका यशस्वी झाला नाही. त्याने 14 टी-20 सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत.

बांगलादेश दौऱ्यावर असलेला भारतीय कसोटी संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, सौरभ कुमार, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

हे पण वाचा :- PhonePe Update : ‘या’ पद्धतीने फोन पे वरून बँक खात्यात ट्रान्सफर करा पैसे ! पहा येथे संपूर्ण प्रक्रिया