Indian Railway Update : इच्छा असूनही चोरांना चोरी करता येत नाही रेल्वेतील पंखे आणि बल्ब, जाणून घ्या यामागचं रंजक कारण..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Railway Update : तुम्ही अनेकवेळा रेल्वेने प्रवास केला असेल किंवा सध्याही तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल. भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवाशी प्रवास करत असतात. आपल्या प्रवाशांसाठी रेल्वे अनेक सुविधा उपलब्ध करत असतात. त्यापैकी काही सुविधा अनेकांना माहिती नसतात.

तुम्ही रेल्वेने प्रवास करताना असे पहिले असतील की रेल्वेतील काही वस्तू चोरीला गेल्या आहेत. मात्र इच्छा असूनही चोरांना पंखे आणि बल्ब चोरी करता येत नाही. कारण हे पंखे आणि बल्ब वापरता येत नाही. का ते जाणून घ्या यामागचं रंजक कारण..

असते पंखे आणि बल्बला इतक्या करंटची गरज

खरं तर, घरात दोन प्रकारची वीज वापरण्यात येते. एक म्हणजे AC आणि दुसरा म्हणजे DC. घरांत AC ची कमाल शक्ती 220 व्होल्ट असते तसेच डीसीमध्ये ही शक्ती 5, 12 आणि 24 व्होल्ट इतकी असते. तर दुसरीकडे, रेल्वेमध्ये बसवण्यात आलेले पंखे आणि बल्ब 110 व्होल्टचे बनवलेले असतात, जे फक्त DC वर चालतात. आता घरांमध्ये वापरण्यात आलेले डीसी पॉवर 110 व्होल्टमध्ये उपलब्ध नसतात, त्यामुळे तुम्ही त्यांचा तुमच्या घरात वापर करू शकत नाही.

वापरली ही पद्धत

रेल्वेमधील प्रवासादरम्यान अनेकवेळा तुमचे मनही अस्वस्थ होत असेल, कारण कधी कधी तुम्हाला रेल्वेच्या टॉयलेटमध्ये तुटलेले नळ दिसत असायचे, तर कधी टॉयलेटमध्ये ठेवण्यात आलेले मगही गायब झाले आहेत.

त्यानंतर आता तुम्हाला त्यांच्या जागी डब्यात लावण्यात आलेले पंखे दिसतील. परंतु पूर्वी रेल्वेमध्ये प्रवास करणारे लोक पंखे उखडून त्यांच्यासोबत घरी घेऊन घ्यायचे. रेल्वेतून पंख्यांची चोरी थांबवण्यासाठी भारतीय रेल्वेने नवीन आयडिया वापरली. रेल्वेने तयार केलेले पंखे आणि बल्ब घरी वापरता येत नाहीत. त्यामुळे इच्छा असूनही चोरांना ते चोरी करता येत नाही.