Indian Railway : तुम्हीही करत असाल रेल्वेने प्रवास तर चुकूनही विसरू नका ‘हे’ नियम, नाहीतर येईल मोठे संकट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Railway : इतर प्रवासापेक्षा रेल्वेचा प्रवास स्वस्त आणि आरामदायी असतो. त्यामुळे दररोज लाखो लोक भारतीय रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वे आपल्या लाखो प्रवाशांच्या हितासाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करत असते.

प्रत्येक प्रवाशांना या सुविधा माहिती नसतात त्यामुळे त्यांना याचा लाभ घेता येत नाही. दरम्यान रेल्वेच्या जशा काही सुविधा आहेत तसेच काही नियम आहेत. त्यामुळे जर तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर हे नियम लक्षात ठेवा नाहीतर तुम्हालाही खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

1. दोन-स्टॉप नियम

समजा चुकून तुमची रेल्वे चुकली तर काळजी करू नका. आता रेल्वेच्या नियमानुसार, TC पुढील दोन स्टेशनपर्यंत किंवा किमान एक तासापर्यंत तुमची सीट दुसऱ्या कोणत्याही प्रवाशाला देऊ शकत नाही.

2. मिळेल तत्काळ तिकिटावर रिफंड

तत्काळ तिकिटांवरही रिफंडची सुविधा देण्यात येते हे अनेक प्रवाशांना माहिती नाही. परंतु, जर रेल्वे तीन तासांपेक्षा जास्त उशीरा आली तर परतावा देण्यात येतो.

3. TTE ला 10 नंतर तिकीट मागता येत नाही

आता रेल्वेच्या नियमांनुसार, TTE ला 10 नंतर तिकीट मागता येत नाही. तसेच इतर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीही असेच काही नियम केले गेले आहेत.

4. मिळते वैद्यकीय मदत

रेल्वे प्रवासादरम्यान समजा तुमची तब्येत ठीक नसेल तर तुम्हाला टीसी इत्यादीसारख्या रेल्वे कर्मचार्‍यांकडून वैद्यकीय मदत घेता येते. रेल्वेकडून प्राथमिक उपचारासोबतच वैद्यकीय आपत्कालीन सुविधा पुरवण्यात येतात.

5. मिळतो संपूर्ण तिकिटावर परतावा

समजा काही कारणास्तव तुमची रेल्वे गंतव्यस्थानी पोहोचली नाही आणि मध्येच थांबली. तसेच, जर रेल्वे तुम्हाला दुसरी रेल्वे देऊ शकत नसल्यास, तुम्हाला रेल्वेकडून संपूर्ण तिकिटावर परतावा मागता येतो. जर रेल्वेने उर्वरित प्रवासासाठी इतर कोणत्याही रेल्वेची व्यवस्था केली असेल आणि तुम्हाला प्रवास पूर्ण करायचा नसल्यास तरीही तुम्हाला उर्वरित प्रवासासाठी परतावा मागता येतो.