Indian Railways : प्रवाशांसाठी रेल्वेची भन्नाट सुविधा! झटक्यात मिळेल कन्फर्म तिकीट, कसे ते पहा..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Railways : जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल किंवा रेल्वेने प्रवास करणार असाल तर प्रवासासाठी तुमच्याकडे तिकीट असणे खूप गरजेचे आहे. जर तुमच्याकडे तिकीट नसेल तर तुम्हाला प्रवास करता येत नाही. इतकेच नाही तर तुम्हाला दंड भरावा लागतो.

अनेकदा प्रवाशांना एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेरगावी जायचे असते त्यावेळी त्यांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. त्यांना वेटिंगवर थांबावे लागते. बऱ्याचवेळा तर प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळत नसल्याने इतर वाहनांनी प्रवास करावा लागतो. परंतु आता रेल्वेने एक खास सुविधा आणली आहे ज्याच्या मदतीने तुम्हाला कन्फर्म तिकीट दिले जाईल.

तुम्हाला आता रेल्वे रिझर्व्हेशन काउंटर आणि IRCTC वेबसाइटवरून तत्काळ तिकीट बुकिंग मिळेल. आयआरसीटीसी वेबसाइटवरून बुकिंग करत असणारे बरेच जण अनेकदा तक्रार करतात की ते पेमेंट पर्यायावर पोहोचेपर्यंत, त्या वेळी संपूर्ण सीट भरली जाते. त्यामुळे त्यांना कन्फर्म तिकीट मिळत नाही.

ही आहे खास सुविधा

जर तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागत असेल तर, तुम्हाला आता एक सोपी युक्ती अवलंबून तत्काळ तिकीट सहज बुक करता येईल. भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी मास्टर लिस्ट फीचरची सुविधा देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्हाला आता कन्फर्म तिकीट सहज मिळेल.

तुम्हाला आता मास्टर लिस्ट वापरून प्रवाशाचे नाव, पत्ता, वय, बर्थ तपशील भरता येईल. ज्यावेळी तुम्ही तत्काळ बुकिंग करत असता त्यावेळी तुम्हाला हे तपशील भरावे लागत नाहीत. प्रवाशांनी जोडा वर क्लिक केले तर, सर्व तपशील आपोआप जोडण्यात येतात.

तर तुम्हाला मिळेल कन्फर्म तिकीट

तुम्हाला मास्टर फीचर वापरण्यासाठी, IRCTC वेबसाइटवर जाऊन माझे खाते मध्ये माझे प्रोफाइल निवडावे लागणार आहे. त्यानंतर, तुम्हाला Add/modify Master List हा पर्याय निवडावा लागणार आहे. यानंतर प्रवाशाचे तपशील भरून सबमिट करा. यानंतर, बुकिंग करत असताना माय सेव्हड पॅसेंजर्स सूचीमधून तुमचे बुकिंग सहज करण्यात येते. ही युक्ती तुमचा बुकिंगचा वेळ वाचून तुमची कन्फर्म तिकिटे त्वरित मिळण्याची शक्यता वाढली जाते.