बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- जिल्ह्याच्या काही भागात विशेषत: ग्रामीण भागात अद्यापही करोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याबाबत बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात.

असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून करोना उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले.

अद्याप ग्रामीण भागात रुग्ण आढळून येत आहेत. ही बाब गांभीर्यांने घेणे आवश्यक आहे. गावात बाहेरगावाहून आलेल्या आणि आजाराची लक्षणे असणार्‍या व्यक्तींची तपासणी होणे गरजेचे आहे.

त्यादृष्टीने गावात कार्यरत विविध पथकांनी आता सक्रीय भूमिका बजावणे गरजेचे आहे. जिल्ह्यात आता लसीकरण मोहिम18 ते 44 वयोगट तसेच 45 व त्यापुढील नागरिकांसाठी सुरु आहे.

त्या-त्या ग्रामीण रुग्णालय अथवा लसीकरण केंद्रावर जाऊन नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे. तेथील आरोग्य यंत्रणेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, जेणेकरुन अशा केंद्रावर गर्दी होणार नाही.

सध्या जरी रुग्णसंख्येत काहीशी घट दिसून येत असली तरी संसर्गाचा धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे,

विशेषता सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणेआणि वारंवार हात धुणे आणि सॅनिटायझरचा वापरकरणे आवश्यक आहे.

करोनामुक्त गाव ठेवायचे असेल तर नियमांचे पालन करावे लागणार असल्याची बाब तालुकास्तरीय अधिकाऱी आणि ग्रामस्तरीय अधिकार्‍यांनी ग्रामस्थांना पटवून द्यावी, असे डॉ. भोसले यांनी सांगितले.