Infinix smartphone : आजपासून विकत घेता येणार Infinix चा शक्तिशाली स्मार्टफोन, कमी किमतीत मिळणार जबदस्त फीचर्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Infinix smartphone : Infinix च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण काही दिवसांपूर्वी Infinix Note 12i हा फोन लाँच झाला होता. तो तुम्ही आज दुपारी 12 वाजल्यापासून विकत घेऊ शकता. या फोनची किंमत 9,999 रुपये इतकी आहे.

जर तुम्हाला कंपनीचा हा होणं विकत घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी फ्लिपकार्टवर जावे लागणार आहे. यामध्ये तुम्ही तो अजून कमी किमतीत विकत घेऊ शकता. कारण यावर कॅशबॅक सारख्या इतर ऑफर उपलब्ध आहेत. जाणून घेऊयात या फोनचे फीचर आणि स्पेसिफिकेशन

असे मिळत आहेत फीचर आणि स्पेसिफिकेशन

कंपनी infinix note 12i फोनमध्ये 6.7-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले देत असून तो 1000 निट्सच्या पीक ब्राइटनेस पातळीसह आणि 180Hz च्या टच सॅम्पलिंग रेटसह येतो. तसेच डिस्प्ले संरक्षणासाठी कंपनीने त्यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 दिले आहे. स्टोरेजचा विचार केला तर या फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज देत आहे. RAM विस्तार वैशिष्ट्यासह, त्याची रॅम आवश्यकतेनुसार 7 GB पर्यंत होते.

कंपनी प्रोसेसर म्हणून तुम्हाला त्यात MediaTek Helio G85 चिपसेट पाहायला मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे दिलेले आहेत. यामध्ये 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आणि 50-मेगापिक्सेल प्राथमिक लेन्ससह QVGA कॅमेरा समाविष्ट आहे.तर सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

या 5000mAhबॅटरी असून बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह सुसज्ज हा फोन आहे. Android 12 वर आधारित XOS 12 OS वर कार्य करतो. या सर्व व्यतिरिक्त, शक्तिशाली आवाजासाठी तुम्हाला या फोनमध्ये DTS सराउंड साउंड मिळतील.