Investment Tips : आजकाल जवळपास सर्वजण आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या चांगल्या भविष्यासाठी गुंतवणूक करतात. काहींना खासगी योजनेत गुंतवणूक करायला आवडते तर काहींना सरकारी योजनेत गुंतवणूक करायला आवडते.
परंतु गुंतवणूक करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. जेणेकरून तुम्हाला जास्त परतावा मिळेल, कोणतीही जोखीम घ्यावी लागणार नाही आणि तुम्हाला भविष्यात कधीच आर्थिक तंगीदेखील येणार नाही. त्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा.
विमा योजना
समजा तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असल्यास तुम्ही सुरक्षित निवृत्ती म्हणून विमा योजनेचा स्वीकार करू शकता. आर्थिक मजबुतीसाठी जीवन विमा आणि अॅन्युइटी या दोन्ही योजनांना प्राधान्य देण्यात येते. सध्या अशा अनेक योजना आहेत ज्या सेवानिवृत्ती उत्पन्न म्हणून सर्वात उत्तम मानल्या जातात. तुम्हाला हवे असेल तर, तुम्ही या योजनांचा अवलंब करू शकता ज्या चांगले व्याजदर देतात, ज्यामुळे तुम्हाला छोट्या गुंतवणुकीतून उत्तम परतावा मिळवता येईल.
आत्तापासूनच करा नियोजन
जर तुम्हाला निवृत्तीनंतर आर्थिक समस्यांना तोंड द्यायचे नसल्यास त्यासाठी आत्तापासूनच नियोजन सुरू करा. तुम्ही विविध ठिकाणी गुंतवणूक करू शकता. हे लक्षात ठेवा की तज्ञांच्या मताशिवाय कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करू नका.
फक्त एकाच ठिकाणी गुंतवणूक करणे देखील फायद्याचे नाही. आता तुम्ही शेअर बाजार, म्युच्युअल फंड, विमा योजनेत गुंतवणूक करू शकता. खरंतर चांगल्या आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी पीएफ उत्तम पर्याय मानला जातो.
तरुण वयात गुंतवणूक
तुम्ही जेवढी कमी वयात गुंतवणूक करता तितका फायदा तुम्हाला होतो.उदाहरणार्थ, जर तुमचे वय 20 ते 25 वर्षे असल्यास, तुम्ही प्रत्येक महिन्याला गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला परतावा मिळेल. सेवानिवृत्तीमध्ये जास्त फायदे मिळवण्याचा सोपा पर्याय म्हणजे तुम्ही जेवढ्या लवकर गुंतवणूक करता तेवढा जास्त पैसा तुमच्याकडे जमा होतो आणि तुम्हाला व्याजातून जास्त मिळते. तुम्हाला तुमच्या पगाराचा काही भाग गुंतवून चांगला परतावा मिळवता येईल.