iPhone 14 Plus : आयफोनप्रेमींना मिळाले मोठं गिफ्ट! iPhone 14 Plus वर होणार हजारोंची बचत, पहा ऑफर

iPhone 14 Plus : आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. या वर्षात Apple सह अनेक दिग्ग्ज कंपन्या आपले स्मार्टफोन लाँच करणार आहे. अशातच आता Apple कडून आयफोनप्रेमींना नवीन वर्षाची भेट मिळाली आहे.

आता iPhone 14 Plus वर 9000 रुपयांची बचत होणार आहे.त्यामुळे स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी गमावू नका.ही ऑफर iPhone 14 Plus च्या 128GB आणि 256GB या दोन्ही मॉडेल्सवर मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशी करा बचत

128GB आणि 256GB असणाऱ्या मॉडेल्सची किंमत 89,900 रुपये आणि 99,900 रुपये आहे. तुम्ही आता 128GB मॉडेल रु. 81,900 मध्ये खरेदी करू शकता. तसेच HDFC बँक कार्डवर रु. 3,000 च्या स्टोअर डिस्काउंट आणि रु 5,000 इन्स्टंट कॅशबॅक तर फोनचे 256GB मॉडेल 90,900 रुपयांमध्ये 4,000 रुपयांच्या इन्स्टंट स्टोअर डिस्काउंट आणि 5,000 रुपयांच्या इन्स्टंट कॅशबॅकनंतर उपलब्ध असणार आहे. तसेच या ऑफरमध्ये नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही उपलब्ध असून यावर  कोणतीही एक्सचेंज ऑफर उपलब्ध नाही.

5 वर्षांनी परतली सीरिज 

Apple चा हा iPhone 14 Plus आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बॅटरीने सुसज्ज असून ही सीरिज 5 वर्षांनंतर परत आहे. शेवटची ‘प्लस’ सीरिज आयफोन 8 प्लस होती, जी 2017 मध्ये लॉन्च करण्यात आली होती.

आयफोन 14 प्लस 6.7-इंचाच्या सुपररेटिना XDR डिस्प्लेसह येतो. हे Apple च्या स्वतःच्या A15 बायोनिक प्रोसेसरवर चालते. हा फोन तीन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध असून 128GB, 256GB आणि 512GB व्हेरिएंट समाविष्ट आहेत. तुम्हाला हा फोन सध्या ब्लू, स्टारलाइट, मिडनाईट ब्लॅक, पर्पल आणि प्रॉडक्ट रेड कलर ऑप्शनमध्ये मिळतो.