IPL 2023: विदेशी खेळाडूंना BCCI ने दिला मोठा झटका ! घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; अनेक चर्चांना उधाण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IPL 2023: IPL 2023  बीसीसीआयने आता जोरदार तयारी सुरु केली आहे. यावेळी IPL 2023 भारतात होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार  IPL 2023 एप्रिल २०२३ सुरु होणार असल्याची चर्चा आहे. 

आयपीएलच्या पुढील हंगामासाठी मिनी लिलाव या महिन्यात म्हणजेच 23 डिसेंबर रोजी होणार आहे. बीसीसीआय आयपीएलच्या पुढील हंगामासाठी ‘इम्पॅक्ट प्लेअर रुल्स’ ही नवीन संकल्पना राबवणार आहे. फुटबॉल, रग्बी, बास्केटबॉल आणि बेसबॉल या खेळांमध्ये हा नियम आधीपासूनच लागू आहे. बीसीसीआयने ऑक्टोबरमध्ये खेळल्या गेलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेदरम्यान या नियमावर चाचणी घेतली.

हा नियम आता आयपीएलमध्येही दिसणार आहे, मात्र हा नियम बदलून बीसीसीआयने परदेशी खेळाडूंना मोठा झटका दिला आहे. इम्पॅक्ट नियमानुसार, कोणताही संघ परदेशी खेळाडूंना प्रभावशाली खेळाडू बनवू शकत नाही किंवा ते परदेशी खेळाडूंना पर्याय म्हणून मैदानावर पाठवू शकत नाहीत.

हा नियम आता फक्त भारतीय खेळाडूंना लागू होईल. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, सर्व फ्रँचायझींना आधीच सांगितले गेले आहे. संघातील कोणतीही बदली डावाच्या 14 व्या षटकाच्या आधी केली जाईल. याशिवाय परदेशी खेळाडू दुसऱ्या परदेशी खेळाडूला पर्याय म्हणून बदलू शकत नाही. त्याचबरोबर भारतीय खेळाडूच्या जागी कोणताही परदेशी खेळाडू बदली म्हणून येऊ शकत नाही.

त्याच वेळी, बदललेला खेळाडू आपला पूर्ण कोटा गोलंदाजी करू शकतो किंवा नवीन फलंदाजाप्रमाणे फलंदाजी करू शकतो. या नियमाबद्दल माहिती देताना, बीसीसीआयने सांगितले होते की, ‘आयपीएल 2023 पासून एक नवीन आयाम जोडण्यासाठी एक संकल्पना सादर केली जाईल, ज्यामध्ये प्रत्येक संघातील एक पर्यायी खेळाडू आयपीएल सामन्यात अधिक सक्रिय भाग घेऊ शकेल. यासंबंधीची नियमावली लवकरच जारी केली जाणार आहे.

हे पण वाचा :- Government Scheme : सरकारची मोठी घोषणा ! मुलीच्या जन्मावेळी पालकांना मिळणार 50 हजार रुपये ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया