Jio Recharge Plan : जिओ ही आघाडीची टेलिकॉम कंपनी सतत इतर टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देत असते. शिवाय कंपनी ग्राहकांच्या बजेटचा विचार करून रिचार्ज प्लॅनच्या किमती ठरवत असते, त्यामुळे कंपनीकडे जास्त ग्राहक आहेत.
आपले दोन रिचार्ज प्लॅन आणले आहेत. जे तुमच्या बजेटमध्ये आहेत. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3 GB डेटा आणि मोफत Netflix सबस्क्रिप्शन मिळेल. जर तुम्हाला जास्त डेटा हवा असेल तर तुम्ही हा प्लॅन रिचार्ज करू शकता. जाणून घेऊयात सविस्तर.
रिलायन्स जिओचा 1099 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
रिलायन्स जिओच्या या 1099 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची वैधता एकूण 84 दिवसांची आहे. कंपनीच्या या शानदार प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2 GB डेटा मिळेल.. तसेच, दररोज उपलब्ध असणारा डेटा संपल्यानंतर, त्याचा वेग 64Kbps पर्यंत कमी होतो. इतकेच नाही तर 5G नेटवर्क वापरणारे ग्राहक या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटाचा पूर्ण वापर करू शकतात.
इतकेच नाही तर तुम्हाला दररोज अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि 100 एसएमएस मिळण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पॅकमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील देण्यात येत आहे. तसेच या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioCloud चे मोफत सदस्यत्व उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु या प्लॅनमध्ये तुम्हाला JioCinema Premium चा लाभ घेता येणार नाही.
रिलायन्स जिओचा 1499 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
रिलायन्स जिओच्या या शानदार रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3GB डेटा दिला जात आहे. म्हणजेच तुम्हाला एकूण 252 जीबी डेटाचा लाभ मिळत आहे. त्याचा डेटा संपल्यानंतर, वेग 74Kbps पर्यंत कमी होईल. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला 5G नेटवर्कवर अनलिमिटेड 5G इंटरनेटचा लाभ घेता येईल. या प्लॅनमध्ये देशभरात अनलिमिटेड व्हॉईस कॉल सुविधा आणि दररोज 100 मोफत एसएमएस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
रिलायन्स जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला OTT प्लॅटफॉर्म Netflix चे मोफत बेसिक सबस्क्रिप्शन दिले जात आहे. ज्यात JioTV, JioCinema आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे.