अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :-  संगमनेर शहरात सय्यदबाबा चौकात बुधवारी अज्ञात इसमाने अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर शहरातील सय्यद बाबा परिसरातील साडे सतरा वर्षांची मुलगी कुटुंबासह राहत होती.

अज्ञात इसमाने तिला फूस लावून पळवून नेले. आपली मुलगी घरात न दिसल्याने तिच्या आईने मुलीचा शोध घेतला. मात्र ती कुठेही आढळून आली नाही.

आपल्या मुलीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले अशी फिर्याद सदर मुलीच्या आईने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.