Petrol Diesel Price : जाहीर झाले पेट्रोल-डिझेलचे नवीनतम दर, पेट्रोल पंपावर जाण्यापूर्वी जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात सतत कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतो. केंद्र सरकारने मागील काही महिन्यांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दर कमी करणार असल्याची घोषणा केली होती.

परंतु,मागील सात महिन्यांपासून देशातील तेलाच्या किमती जैसे थे आहेत. अशातच देशात आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामुळे वाढत्या महागाईत काहीसा दिलासा मिळाला आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी रविवार 18 डिसेंबर 2022 साठी पेट्रोल-डिझेलच्या किमती जाहीर केल्या आहेत. किमतींनुसार पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नसल्याने सलग 208 व्या दिवशी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती

मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत नरमाई दिसून येत असून डब्ल्यूटीआय क्रूडची किंमत प्रति बॅरल $74 पर्यंत खाली आली आहे तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल सुमारे $ 81 इतकी आहे.

जुलै 2008 नंतर या वर्षी म्हणजे मार्चमध्ये कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $140 वर पोहोचल्या आहेत. तेव्हापासून 46 टक्क्यांच्या घसरणीसह, ते प्रति बॅरल $76 च्या जवळ व्यापार करत असून ही या वर्षातील सर्वात कमी पातळी आहे.

कच्च्या तेलाचा लीटर आणि रुपयाच्या संदर्भात अंदाज लावायचा झाला तर 9 महिन्यांत किंमत 33 रुपयांपेक्षा जास्त कमी झाली पाहिजे. यानंतरही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीच कपात झाली नाही.

या पूर्वी केंद्र सरकारने 21 मे रोजी उत्पादन शुल्कात कपात केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर उत्पादन शुल्कात 6 रुपयांनी कपात केली होती.

त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली होती. यानंतर देशात पेट्रोलचे दर 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले. सरकारच्या या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केल्याचे दिसून आले होते

देशातील महानगरांमध्ये हे आहेत दर

दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर आहे. तर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. यासोबतच चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

येथे आहे सर्वात जास्त महाग पेट्रोल-डिझेल

राजस्थानातील गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल विकले जात आहे. गंगानगरमध्ये पेट्रोल 113.48 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 98.24 रुपये प्रति लिटर आहे. तर हनुमानगड जिल्ह्यात पेट्रोल 112.54 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 97.39 रुपये प्रतिलिटर आहे.

येथे आहे सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल

सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये मिळत आहे. येथे पेट्रोल 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 79.74 रुपये प्रति लिटर आहे.

हे आहेत आजचे दर

दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.

मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.

कोलकाता: पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.

चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.

हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.

बंगळुरू: पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.

तिरुअनंतपुरम: पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.

पोर्ट ब्लेअर: पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.

भुवनेश्वर: पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर.

चंदीगड : पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर.

लखनौ : पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर.

नोएडा: पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर.

जयपूर : पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर.

पाटणा : पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

गुरुग्राम: 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर.

म्हणून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या

पेट्रोलआणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर किमत जवळपास दुप्पट होते. त्यामुळे परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती काय आहेत यावर अवलंबून पेट्रोलआणि डिझेलच्या किमती रोज बदलत असतात.

असे जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

पेट्रोल-डिझेलचे दररोज सकाळी 6 वाजता अपडेट होतात. तर तुम्ही पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर शहर कोडसह RSP 9224992249 वर पाठवू शकतात आणि BPCL ग्राहक 9223112222 वर RSP पाठवू शकतात. तर, HPCL ग्राहक HP Price 9222201122 वर पाठवून दर जाणून घेऊ शकतात.