अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-सीए म्हणजेच चार्टर्ड अकाऊंटकडे 50 लाखाची खंडणी मागणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली.
राहूल सुखदेव गायकवाड (रा.कोहकडी, पारनेर) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कोर्टाने या आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, राहूल गायकवाडने गावातीलच सीए गणेश सिताराम गायकवाड यांना धमकी देत 50 लाखाची खंडणी मागितली होती.
कोहकडीमधील माळवडी वस्ती येथील गायकवाड हे चार्टर्ड अकाऊंटअसून ते जमिन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात.
गणेश गायकवाड यांना अनोळखी व्यक्तीने वेळोवेळी फोन करुन जिवे ठार मारण्याची धमकी देत 50 लाखाची खंडणी मागितली.
गणेश गायकवाड यांनी 19 मार्चला सुपा पोलिसांत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास एलसीबीचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पोलीस पथकाने गुप्त खबर्याकडून माहिती काढली.
खंडणी मागणारा राहूल गायकवाड याला पुणे येथून सापळा लावून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्हा केला असल्याची कबुली दिली.