LIC : फक्त एकदाच प्रीमियम भरून मिळवा जबरदस्त परतावा, जाणून घ्या या योजनेविषयी महत्त्वाच्या गोष्टी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC : एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन योजना घेऊन येत असते. त्यापैकी एक म्हणजे जीवन सरल पेन्शन योजना होय, एलआयसीच्या या पेन्शन योजनेत एकरक्कमी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. तुम्ही ही गुंतवणूक ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करू शकता.

या योजनेअंतर्गत तुम्हाला 6 महिन्यात कर्ज सुविधा उपलब्ध होते. या योजनेत तुम्हाला कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. तसेच निश्चित परतावा गुंतवणूकदारांना या योजनेत देण्यात येतो. काय आहे एलआयसीची ही योजना जाणून घ्या.

कोणाला करता येते गुंतवणूक

या योजनेची खासियत म्हणजे या योजनेत पती-पत्नी एकत्रित लाभ घेऊ शकतात. यातील प्राथमिक पेन्शनधारकाला ही पेन्शन मिळते. तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या जोडीदाराला पेन्शन देण्यात येते. समजा या दोघांचा मृत्यू झाला तर, मूळ प्रीमियमची रक्कम नॉमिनीला देण्यात येते.

गुंतवणूकदारांचे वय किती असावे ?

सरल पेन्शन योजनेत 40 ते 80 वयोगटातील लोकांना गुंतवणूक करता येते. समजा तुम्ही एकदा पॉलिसी घेतली आणि जर काही कारणास्तव तुम्ही ती पुढे चालू ठेवता आली नाही तर 6 महिन्यांच्या आत पॉलिसी देखील सरेंडर करता येते.

प्रत्येक महिन्याला मिळणार पेन्शन

एलआयसीचे आर्थिक सल्लागार अशोक रात्रे यांच्या मतानुसार, सेवानिवृत्तीसाठी ही पेन्शन योजना हा सर्वात चांगला पर्याय आहे. जर एखाद्या व्यक्तीने या योजनेत निवृत्तीदरम्यान मिळालेले पीएफ आणि ग्रॅच्युइटीचे पैसे गुंतवून एकरकमी वार्षिकी खरेदी केली असल्यास तर त्या व्यक्तीला लगेच पेन्शन मिळेल.

समजा या योजनेत 60 वर्षांच्या व्यक्तीने 10 लाख रुपये जमा करून अॅन्युइटी खरेदी केली तसेच त्या व्यक्तीने पेन्शनसाठी वार्षिक पर्याय निवडला, तर त्याला 5.11% व्याज दराने प्रत्येक वर्षी 51,100 रुपये पेन्शन मिळते. याचा असा अर्थ की त्याला प्रत्येक महिन्याला त्याला 4258 रुपये पेन्शन म्हणून मिळतात.

आहे फायदेशीर योजना

या योजनेतील गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली नाही. परंतु या योजनेअंतर्गत समजा एकदा प्रीमियम भरला तर कोणत्याही व्यक्तीला वार्षिक, सहामाही, त्रैमासिक किंवा मासिक आधाराचा पर्याय घेता येते. तसेच, वार्षिक (लवकर) पर्याय निवडला तर त्या व्यक्तीला 5.11% व्याज मिळते, तर मासिक पर्यायासाठी व्याज 4.92% पर्यंत येते.

आयकरात सूट

  • LIC च्या या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जर तुम्ही पॉलिसीसाठी 6 महिने पूर्ण केले असल्यास तुम्हाला त्यावर कर्ज घेता येते.
  • इतकेच नाही तर, या पेन्शन योजनेअंतर्गत, तुम्हाला आयकराच्या कलम 80C अंतर्गत आयकरात सूट देण्यात येते.
  • समजा तुम्ही पॉलिसी सुरू ठेवू शकत नसल्यास 6 महिन्यांत सरेंडर केल्यावर तुम्हाला 95% सरेंडर व्हॅल्यूसह पैसे परत मिळतात.