LPG Gas Cylinder : दिलासादायक! गॅस सिलेंडरच्या किमतीत आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण, लगेच जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Gas Cylinder : देशात मागील काही दिवसांपासून इंधनाच्या किमतीत वाढ होत आहेत. त्यामुळे याचा सर्वसामान्य नागरिकांना फटका सहन करावा लागत आहे. अगोदरच नागरिकांचे महागाईने कंबरडे मोडले आहे. त्यात इंधनाचे वाढते दर यामुळे नागरिकांना दुहेरी झळ सहन करावी लागत आहे.

अशातच गॅस सिलेंडर धारकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण गॅस सिलेंडरच्या दरात खूप मोठी घसरण झाली आहे. परंतु हे लक्षात घ्या की ही घसरण फक्त व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात झाली आहे.

या महिन्याच्या 1 तारखेला सरकारकडून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत सर्वात मोठी कपात करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर व्यावसायिक गॅस सिलिंडर 171.50 रुपयांनी स्वस्त झाला असून आता एलपीजी गॅस सिलिंडरबद्दल सांगायचे झाल्यास त्याच्या किमतीत आतापर्यंत कोणताही बदल करण्यात आला नाही.

परंतु अजूनही घरगुती ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. हे लक्षात ठेवा की देशभरातील एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत किती बदल करायचा आहे हे सर्व तेल कंपन्या ठरवत असतात.

व्यावसायिक सिलिंडर इतक्या रुपयांनी स्वस्त

ज्यावेळी कच्च्या तेलाच्या किमती वाढत असतात त्यावेळी गॅसच्या किमतीही वाढ होत असते. त्यानंतरच एलपीजीचे दरातही वाढ करण्यात येते. ज्यावेळी कच्च्या इंधनाच्या किमती कमी होत असतात त्यावेळी एलपीजीचे दरही कमी होत असतात.

दरम्यान एलपीजी गॅसच्या दरात प्रत्येक महिन्याला चढ-उतार पाहायला मिळत असतात. तसेच प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला तेल कंपन्या नवीन गॅसच्या किमती जाहीर करण्यात येतात. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीही अपडेट होत असून आतापर्यंत 92 रुपयांनी दर कमी झाले आहे.

जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

मागील वर्षी म्हणजेच एप्रिल महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत कमी केली होती. दिल्ली येथे 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 2028 रु पर्यंत वाढ केली होती. तर मुंबई येथे हा दर 1980 रुपये होता.

कोलकात्यात गॅस सिलेंडरची किंमत 2132 रुपये तसेच चेन्नईमध्ये 2192.50 रुपये इतका आहे. दरम्यान 1 मार्च 2023 रोजी जाहीर झालेल्या किमतींनंतर, दिल्ली येथे व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 2119.50 रुपये इतकी होती. मुंबई येथे 2071.50 रुपये, चेन्नईमध्ये 2268 रुपये आणि कोलकातामध्ये 2221.50 रुपये झाली आहे.