कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मढी गाव व कानिफनाथांचे समाधी मंदिर तिन दिवस राहणार बंद!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी तालुक्यातील  मढी गाव व कानिफनाथांचे समाधी मंदिर तिन दिवस बंद राहणार आहे.

कोरोना साथ रोगाची वाढते प्रमाण व  बाधितांंची संख्या लक्षात घेता  खबरदारीचा उपाय म्हणून  प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन देवस्थान समितीने व ग्रामपंचायत यांच्या वतीने हा घेतल्याची माहीती देवस्थानचे अध्यक्ष व सरपंच संजय मरकड यांनी दिली .

नुकतीच तालुक्यातील शिरसाटवाडी येथे १९ मार्च रोजी रॅपिड टेस्टमध्ये तब्बल चौदा रुग्ण आढळल्यानंतर २३ ते २९ मार्च पर्यंत शिरसाठवाडी हे गाव कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या दरम्यान सर्व व्यवहार देखील बंद राहणार आहेत.

मढी येथील चैतन्य कानिफनाथ यांची यात्रा होळीपासून गुढीपाडवा पर्यंत चालते. प्रशासनाने यात्रा यापूर्वीच बंद केल्याने नाथांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागातून भाविक येथे येऊन दर्शन घेत आहेत. त्यामुळे साथ रोगाची लागण झाली असावी अशी ग्रामस्थांना शक्यता वाटते.

त्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी व देवस्थान समितीने प्रशासनाला जनता कर्फ्यू बाबत माहिती दिली. होळीच्या दिवशी सायंकाळी कैकाडी समाजाला मानाची काठी मंदिराच्या कळसाला टेकवण्यासाठी फक्त पाच लोकांना प्रशासनाने परवानगी दिली असून, सायंकाळी मानाची होळी पेटवण्यासाठी गोपाळ समाजातील पाच मानकरी यांना परवानगी देण्यात आलेली आहे.

याशिवाय होळी, चतुर्थी, रंगपंचमी, नाथषष्ठी, अमावस्या, गुढीपाडवा या दिवशी प्रशासनाने जमाबंदी आदेशासह यात्रा बंदी जाहीर केल्याने यात्रेकरूंची गर्दी आता वाढून संपूर्ण परिसर यात्रामय बनला आहे.

स्थानिक प्रशासनाला यात्रेबाबत देवस्थान प्रशासनाकडून दैनंदिन माहिती मिळत नसल्याने भाविक बंदी आदेश मिळूनही गर्दी करतात. त्यामुळे प्रशासनाने आता मढी गावासाठी यात्रा होईपर्यंत पूर्णवेळ पोलिस व सक्षम नियंत्रक अधिकारी नियुक्त करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24