Maruti Suzuki : मारुती सुझुकीने केलं असे काही जे कोणालाच जमलं नाही ! AC नसला तरीही थंड राहील कार..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maruti Suzuki : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. या दिवसात कडक उन्हापासून वाचण्यासाठी अनेकजण कार चालवत असताना कारच्या एसीचा वापर करत असतात. परंतु एसी चालू असल्याने त्याचा परिणाम कारच्या मायलेजवर दिसून येतो. त्यामुळे वापरकर्त्यांना आर्थिक फटका बसतो, परंतु तुमची आता ही समस्या दूर होऊ शकते.

पुढील महिन्यात नवीन मारुती सुझुकी फ्रॉन्क्स लाँच होणार आहे. कंपनी या कारमध्ये एक खास फिचर देत आहे ज्यामुळे तुम्हाला एसी लावण्याची कसलीच गरज पडणार नाही. यामुळे तुमच्या कारचे मायलेज कमी होणार नाही. कंपनीची ही कार सध्या लाँच झाली नाही.

मागील काही दिवसांपासून मारुती फ्रँक्स चर्चेचा विषय बनली आहे. या कारच्या बुकिंगने अनेक रेकॉर्ड मोडून काढले आहेत. आता कंपनीने या कारचे असे खास वैशिष्ट्य आणले आहे, ज्यामुळे या कारच्या बुकिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

कमी किमतीत चांगले फीचर्स देण्याच्या बाबतीत मारुती सुझुकीला कोणीही मागे टाकू शकत नाही. नवीन मारुती सुझुकी फ्रँक्समध्ये यूव्ही कट ग्लास देत आहे. या फीचरमुळे उन्हाळ्यातही ही कार गरम होत नाही. साहजिकच तुम्हाला एसी लावण्याची गरज पडणार नाही.

कसे करते हे फिचर काम

उन्हाळ्याच्या दिवसात सूर्यप्रकाशातील हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरण थेट कारमध्ये येत असतात, परंतु जेव्हा कारला यूव्ही कट ग्लास लावण्यात येते तेव्हा हे हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांना कारमध्ये प्रवेश करता येत नाहीत. त्यामुळेच कारमधील तापमान 2-3 अंश सेल्सिअसने कमी होते आणि जर गाडी थंड असल्यास एसी चालू करण्याची गरज पडत नाही. सध्‍या, भारतात या सेगमेंटमध्‍ये UV कट ग्लाससह फक्त मारुती फ्रँक्‍स ऑफर करण्यात येते.