Masik Durga Ashtami : दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला दुर्गाष्टमी व्रत केले जाते. हा दिवस माता दुर्गाला समर्पित आहे. लोक भक्तिभावाने लक्ष्मीमातेची पूजा करतात. श्रावण महिन्यात 24 ऑगस्टला दुर्गाष्टमीचा उपवास केला जाणार आहे. अष्टमी तिथी पहाटे 3:31 वाजता सुरू होईल, तर शुक्रवार, 25 ऑगस्ट रोजी पहाटे 3:10 वाजता समाप्त होईल.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, गुरुवार, 24 ऑगस्ट रोजी ग्रहांचा अद्भुत संयोग होत आहे. बुध, बुद्धी आणि विवेकाचा कारक, सिंह राशीमध्ये उलट फिरेल. त्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहार. काहींसाठी ते शुभ तर काहींसाठी अशुभ असणार आहे. पण अशा चार राशी आहेत ज्यांच्यासाठी दुर्गाष्टमीचा दिवस खूप शुभ राहील. या काळात त्यांची संपत्ती आणि समृद्धी वाढण्याची दाट शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला फायदा होणार आहे. एकूणच 24 ऑगस्टचा दिवस या लोकांसाठी खूप उत्तम राहील. या काळात त्यांना जुन्या मित्रांची साथ मिळेल. त्यामुळे त्यांचे मन प्रसन्न राहील, तसेच कुटुंबात सुख-शांती राहील. या काळात नोकरी-व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो.
धनु
धनु राशीच्या लोकांसाठी येणारा दिवस खूप शुभ मानला जात आहे. या काळात कुटुंबातील वातावरण शांत राहील, यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. या काळात धनलाभ व लाभाचे योग आहेत. उत्पन्नात वाढ होऊ शकते. बरेच दिवस रखडलेली कामे मार्गी लागू शकतात.
मेष
मेष राशीच्या लोकांवर माता दुर्गेची विशेष कृपा असणार आहे. या काळात त्यांना नोकरीच्या नवीन संधी मिळतील, ज्यामुळे तुमच्या बऱ्याच अडचणी दूर होतील. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. अचानक धनलाभ व लाभाचे योग आहेत. एकूणच हा काळ उत्तम असेल.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस उत्तम असतील. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात धार्मिक कार्यात रुची वाढेल. लांबच्या प्रवासाला जाण्याची योजना होऊ शकते.