Matter Aera Bike : 150 किमीच्या शानदार रेंजसह बाजारात आली देशातील पहिली 4 स्पीड गियरबॉक्सची इलेक्ट्रिक बाईक, अशी करा बुक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Matter Aera Bike : काही दिवसांपूर्वी मॅटरने देशातील पहिली 4 स्पीड गियरबॉक्सची इलेक्ट्रिक बाइक लाँच केली होती. जर तुम्हाला ती खरेदी करायची असेल तर तुम्ही ती 17 मे 2023 पासून या बाइकची बुकिंग करू शकता.

दरम्यान आगामी बाईक ही कंपनीची तसेच देशातील पहिली गिअरची इलेक्ट्रिक बाईक असणार आहे. कंपनीने आगामी बाईकला एकूण चार व्हेरियंटमध्ये आणले आहे. 150 किमीच्या शानदार रेंजसह तुम्ही ही बाईक खरेदी करू शकता. यात कंपनीने उत्तम फीचर्स दिले आहेत.

जर तुम्हाला ही बाईक खरेदी करायची असेल तर कंपनी 17 मे 2023 पासून या बाइकची बुकिंग सुरू करत आहे. या बाईकमध्ये तुम्हाला 150 किलोमीटरपर्यंतची शानदार रेंज मिळणार आहे. या बाइकमध्ये तुम्हाला 4 स्पीड हायपर शिफ्ट गियर मिळत असल्याने ही बाईक अवघ्या 6 सेकंदात 0 ते 60 चा स्पीड पकडते.

अशी करा बुक

आता तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइट https://matter.in/ वर जाऊन ही बाईक सहज बुक करू शकता. ही बाईक तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरूनही बुक करू शकता. असे सांगण्यात येत आहे की सुरुवातीला कंपनी ही बाईक एकूण 25 शहरांमध्ये वितरित करणार असून यात कोलकाता, दिल्ली, मुंबई, चेन्नई, म्हैसूर, विजयवाडा, मदुराई, हैदराबाद, बेंगळुरू, ठाणे, कोईम्बतूर, पुणे, विशाखापट्टणम, रायगड, नाशिक, गांधीनगर, वडोदरा, सुरत, अहमदाबाद, इंदूर, जयपूर तसेच लखनौ, पाटणा, गुवाहाटी आणि कानपूर यांसारख्या शहरांचा समावेश असणार आहे.

जाणून घ्या फीचर्स

कंपनीकडून या बाइकमध्ये उत्कृष्ट फीचर्स देण्यात येत आहेत. यात लिक्विड कूल्ड बॅटरी दिली असून ही बाईक चालवण्याची किंमत फक्त 25 पैसे प्रति किलोमीटर असल्याचा कंपनीचा दावा आहे. या बाईकमध्ये 7 इंच टचस्क्रीन डिस्प्ले, 4G कनेक्टिव्हिटी, अँड्रॉइड आधारित ऑपरेटिंग सिस्टम, रिमोट लॉक तसेच अनलॉक, जिओफेन्सिंग, लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग, वाहन निदान आणि राइड अॅनालिटिक्स यांसारखी अनेक फीचर्स पाहायला मिळतील.

4 प्रकारात खरेदी करता येणार

कंपनी ही बाईक 4 व्हेरियंटमध्ये बाजारात आणेल. या बाईकचे नाव एरा असून ही बाईक 4000, 5000, 5000 plus आणि 6000 plus व्हेरियंटमध्ये लॉन्च होईल. या बाईकचे तीन व्हेरियंट सिंगल चार्जवर 125 किमीची रेंज देतील असा दावा कंपनीने केला आहे. तर त्याचे 6000 प्लस व्हेरिएंट हे सिंगल चार्जवर 150 किलोमीटरपर्यंतची रेंज देते.

किती आहे किंमत?

किमतीबाबत बोलायचे झाले तर कंपनीकडून सध्या या बाइकची किंमत जाहीर करण्यात आली नाही. मात्र असे मानले जात आहे की कंपनी या बाईकला बाजारात 1.50 ते 2 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च करेल. तसेच त्याचा लुकही खूप स्टायलिश असेल.