Multibagger Stock : गुंतवणूकदारांना 2500% रिटर्न दिल्यानंतर ‘हा’ शेअर 73% झाला स्वस्त, आता फक्त 28 रुपयांमध्ये लगेच करा खरेदी


शेअर बाजारात अनेकजण गुंतवणूक करत असतात. अशा वेळी काही शेअर हे मजबूत परतावा दिल्यानंतर काही काळासाठी स्वस्त देखील होत असतात. यानंतर मात्र स्वस्त शेअर खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Multibagger Stock : जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल आणि स्वस्तात शेअर खरेदीसाठी तयार असाल तर आज आम्ही तुम्हाला एका अशा शेअरबद्दल सांगणार आहे जो तुम्हाला कालांतराने मजबूत परतावा देऊ शकतो.

या स्टॉकने 2021 मध्ये 2,500% इतका मोठा परतावा दिला आहे. आम्ही Brightcom Group Ltd च्या शेअर्सबद्दल बोलत आहोत. मात्र, गुरुवारच्या व्यवहाराच्या दिवशी या शेअरमध्ये चांगली खरेदी झाली आणि स्टॉक 7% वर चढला होता.

एका वर्षात शेअर 73% घसरला

ब्लूमबर्ग डेटानुसार, शंकर शर्माच्या स्टॉकमध्ये 2022 मध्ये जवळपास 73% घसरण झाली आहे, ज्यामुळे तो S&P BSE 500 निर्देशांकावर सर्वात वाईट कामगिरी करणारा ठरला आहे.

घसरणीचे मोठे कारण

गेल्या एका वर्षात हा शेअर 104 रुपयांवरून 28.20 रुपयांपर्यंत घसरला. कंपनीचे काही खुलासे आणि आर्थिक व्यवहार गुंतवणूकदारांसाठी “हानीकारक” असल्याची चिंता बाजार नियामकाने व्यक्त केल्यानंतर शेअर्समधील ही विक्री सुरू झाली आहे.

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने गेल्या वर्षी ब्राइटकॉमच्या आर्थिक बाबींचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यासाठी Deloitte Touche Tohmatsu India LLP ची नियुक्ती केली.

शंकर शर्मा यांची ब्राइटकॉम समूहातील भागीदारी

जुलै ते सप्टेंबर 2022 या तिमाहीसाठी ब्राइटकॉम समूहाच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, अनुभवी गुंतवणूकदार शंकर शर्मा यांच्याकडे ब्राइटकॉम समूहाचे 2.50 कोटी शेअर्स आहेत, जे कंपनीच्या एकूण पेड-अप भांडवलाच्या 1.24 टक्के आहे.